Share

बाप हा बाप असतो, बाॅलीवूड तुमचा बाप आहे; दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूला सुनील शेट्टीने सुनावले

गेल्या अनेक दिवसांपासून साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा वाद सुरू आहे. दोन्ही सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कोण जास्त श्रेष्ठ आहे याचा वाद घालत आहेत. त्यातच नुकेतच दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने ‘बॉलिवूडला तो परवडू शकत नाही’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला. या वादात आता अभिनेता सुनील शेट्टी याने उडी घेतली आहे.

महेश बाबू म्हणाला होता की, बॉलिवूडला तो परवडू शकत नाही आणि त्यामुळेच त्याला हिंदी सिनेमांमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. या त्याच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. महेश बाबूच्या या वक्तव्याला सुनील शेट्टीने सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

सुनील शेट्टी म्हणाला, बाप हा बाप असतो. बॉलिवूड नेहमीच बॉलीवूड राहील. जर तुम्ही भारताला ओळखाल तर तुम्ही बॉलिवूडच्या नायकांनाही ओळखाल. सुनील शेट्टीने आज तकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चालू असणाऱ्या वादावर आपले मत व्यक्त केले, यावेळी त्याने महेश बाबूवर निशाणा साधला.

सुनील शेट्टी म्हणाला, मी दक्षिणेतलाच आहे. पण माझं कामाचं ठिकाण मुंबई आहे, त्यामुळे मला मुंबईकर म्हणतात. साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा वाद सोशल मीडियावरच तयार झाल्याचं मला वाटते असे तो म्हणाला. तसेच म्हणाला, आपण सर्व भारतीय आहोत. उदाहरणार्थ, जर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मकडे पाहिले तर ती भाषा नाही तर विषय महत्त्वाचे आहेत. खरं म्हणजे काय बघायचं आणि काय नाही हे प्रेक्षक ठरवत असतात.

त्रासदायक गोष्ट म्हणजे आपण प्रेक्षकांना विसरलो आहोत. आपण विषयावर काम केलं पाहिजे. मात्र, सिनेमात लोक त्याला नेहमी सांगतात की सिनेमा असो किंवा ओटीटी, बाप नेहमीच बाप असतो आणि कुटुंबातील सदस्य कुटुंबातील सदस्यच राहतो. बॉलिवूड नेहमीच बॉलिवूड राहील. जर तुम्ही भारताला ओळखाल तर बॉलिवूडच्या नायकांना ओळखाल, असेही सुनील शेट्टी म्हणाला.

दरम्यान, केजीएफ 2 या हिट सिनेमातील अभिनेता किच्चा सुदीपनं एका जाहीर कार्यक्रमात हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं वक्तव्य केले होते. यावर अभिनेता अजय देवगण यानं चोख प्रतिउत्तर दिलं होतं. अजयने ट्विट केले होते की, भावा तुझ्या मते जर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. तर तुझ्या मातृभाषेत तयार झालेले सिनेमे तुम्ही हिंदीमध्ये का डब करून रिलीज करता? असा सवाल केला होता.

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now