शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युद्धनौका ‘INS विक्रांत’ प्रकरणात भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांचा मुलगा नील सोमय्याही सहभागी असल्याचे राऊतांनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी या दोघांना समन्स बजावत 11 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
मात्र त्यानंतर हे दोघे पिता-पुत्र नॉट रिचेबल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किरीट्ट सोमय्या मुलासह अंडरग्राउंड झाल्याचे म्हणले जात आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट्ट सोमय्या आणि नील सोमय्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याकारणानेच पोलिसांनी या दोघांना समन्स बजावले आहे.
परंतु आता हे दोघे गायब असल्याचे दिसत आहे. गुरुवारी संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली. या भेटीनंतरच भोसले यांनी पिता-पुत्रावर गुन्हे दाखल केल्याचे समोर आले आहे. परंतु राऊतांचे सर्व आरोप सोमय्यांनी फेटाळून लावले आहेत.
माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण त्याबाबतचे पुरावे द्यावे, असे सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. तर यावर प्रतिउत्तर देत ”आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता.” तर ”निधी जमा करा, मग मी पुरावे देतो,” असे राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा करत ते पैसे निवडणुकीसाठी तसंच मुलाच्या कंन्स्ट्रक्शन कंपनीत वापरल्याचा गंभीर आरोप राऊतांनी किरीट्ट सोमय्यांवर केला होता. यावेळी सोमय्या आणि त्यांच्या मुलावर कडक कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली होती.
राऊतांनी केलेल्या या आरोपानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखीन चिघळला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सोमय्या आणि राऊतांमध्ये तर आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरु झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
सोनम कपूरला मोठा धक्का, घरावर पडला 1.41 कोटींचा दरोडा, ‘या’ 34 व्यक्तींवर संशय
औरंगाबाद हादरले! प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीसह ६ मैत्रिणींनी खाल्ले विष; तिघींचा मृत्यू
एसटी कर्मचाऱ्यांना सदावर्तेंच्या पत्नीच्या नावाने येत आहेत ‘असे’ मेसेज, प्रकरण चिघळणार?
आता शेतकऱ्यांनाही भरावा लागणार इन्कम टॅक्स, आयकर विभागाच्या रडारवर ‘हे’ शेतकरी; करणार मोठी कारवाई