faruk abdulla on uddhav thackeray | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाषणे दिली आहे. उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमात भाषण दिले आहे. जे चर्चेचा विषय ठरले आहे.
शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात. पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. या कार्यक्रमाला नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी फारुख अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. या भेटीत नक्की काय झालं हेही उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, फारुक अब्दुल्ला यांची आणि माझी भेट झाली, तेव्हा ते म्हणाले की घाबरु नकोस. तुझ्या वडिलांसारखं लढ.
फारुख अब्दुल्ला आणि माझी बऱ्याच दिवसांनी भेट झाली. यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे त्यांचे वय झाले आहे. दुसरे महाराष्ट्र आणि जम्मु काश्मीर खुप लांब आहे. ते मला जेव्हा भेटले तेव्हा आमचा खुप चांगला संवाद झाला. ते म्हणाले की, घाबरु नकोस, तुझ्या वडीलांसारखा लढ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाचंच वय वाढत असतं. पण बाळासाहेब म्हणायचे की माणसाचे विचार जेव्हा थकतात तेव्हा तो वृद्ध होत असतो. त्यामुळे छगन भुजबळ, फारुख अब्दुल्ला असो वा शरद पवार ही अजूनही तरुण माणसं आहेत. ही फक्त तरुण माणसंच नाहीत. त्यांच्या मनात एक जिद्द सुद्धा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतंय. हिंमत असेल, तर मैदानात या. एकाच व्यासपीठावर या. समोरासमोर काय आहे ते एकदाचं होऊन जाऊद्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
chandrakant patil : मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून घेतले कोट्यवधी रुपये? ऑडिओ क्लीप व्हायरल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवणार; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे वक्तव्य
Rohit Sharma: दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा दारूण पराभव, राहुलच्या मेहनतीवर फेरले पाणी, वर्ल्डकपला कसं होणार?