केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘पीएम सन्मान निधी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना या योजनेमुळे थोडी तरी आर्थिक मदत मिळते. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करताना रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
PM किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक टाकणं आता अनिवार्य झाले आहे. तुमच्या नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे. तसेच रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेसह, नोंदणी दरम्यान, केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी म्हणजेच पीडीएफ बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील.
तसेच मागील हप्त्यापासून शेतकऱ्यांसाठी केवायसीही अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे हे रद्द करण्यात आले आहे. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचे बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे. बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. यासाठी पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan. gov. in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा.
आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि आधार तपशील संपादित करा या पर्यायावर क्लिक करून अपडेट करावी लागणार आहेत. आता यात ज्या शेतकऱ्यांना ११ हप्ता मिळाला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कमही मिळणार आहे.
११ वा हप्ता अडकणाऱ्या शेतकऱ्यांना आता एकदम ४ हजार रुपये मिळणार आहेत. ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांचा अर्जही स्वीकारला गेला असेल, पण काही कारणास्तव हप्ता अडकला असेल तर अशा शेतकऱ्याला ४ हजार रुपये मिळतील.