Share

शेतकऱ्याचा नादखुळा प्रयोग! गुरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी छतावर बसवलं ‘हे’ उपकरण, लोकांनी केलं कौतुक

सध्या सगळीकडेच उष्णता वाढली आहे. अनेक राज्यांत तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केला आहे. लोकांना उष्णतेचा प्रचंड त्रास होत असल्याने, एसी, कुलर यासारख्या वस्तूंचा अवलंब लोक करत आहेत. मात्र, जनावरांना देखील उष्णतेमुळे त्रास होत असतो. परंतु त्यांच्या बचावासाठी कोणताच पर्याय नाही. यावर आता एका शेतकऱ्याने भन्नाट उपाय काढला आहे.

वाशिम जिल्ह्याच्या एका अवलिया पशुपालक शेतकऱ्याने आपल्या म्हशींना तापमानाच्या कहरापासून वाचवण्यासाठी एक अप्रतिम आणि हटके देशी जुगाड केला आहे. या जुगाडाची चर्चा आता संपूर्ण देशात चर्चा होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यानंतर असा हटके जुगाड आपल्या जनावरांसाठी केला आहे.

महाराष्ट्रातील वाशिममधील उमरा गावाचे रहिवाशी पशुपालक शेतकरी प्रवीण काळे गेल्या अनेक वर्षांपासून पशुपालन करत आहेत. प्रवीण यांच्याकडे एकूण 13 दुभत्या म्हशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला असून, त्याचा लोकांना आणि जनावरांना देखील त्रास होत आहे.

या तापमानाचा परिणाम प्रवीण काळे यांच्या दुभत्या म्हशींवर पडला. त्यामुळे म्हशींनी दूध देणे बंद केले. वाढत्या तापमानामुळे पशुपालक शेतकऱ्याच्या दूध व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. अशीच काहीशी अडचण प्रवीण यांना देखील जाणवली.

हेच टाळण्यासाठी या शेतकऱ्याने एक भन्नाट कल्पना शोधून काढली. प्रवीण यांनी तबेल्यात म्हशीसाठी शॉवर बसवण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी ह्या देशी जुगाडसाठी एक मोटार घेतली, तबेल्याच्या छतावर 6 फॉगर्स बसवले आणि पाईपच्या साहाय्याने जोडले.

फॉगरला जोडलेला पाईप पाण्याच्या टाकीत टाकला. एवढेच नाही या शेतकऱ्याने लोडशेडिंगच्या समस्याचे देखील समाधान शोधून काढले आहे. या शेतकऱ्याने वीज नसेल तरीही शॉवर सुरु ठेवता येईल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. यासाठी या शेतकऱ्याने सौरऊर्जेच्या प्लेटचा उपयोग घेऊन त्याला कारंजे जोडले आहेत. हे सगळं करण्यासाठी फक्त 4 ते 5 हजार खर्च येतो.

शेती इतर

Join WhatsApp

Join Now