Share

शेतकऱ्यांची चिंता वाढली, राज्यात ‘या’ ठिकाणी पडणार कडाक्याची थंडी आणि गारपिटीसह पाऊस

mahrashtra rainfall 2

देशात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज देशातील काही राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. महाराष्ट्र्रातील मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर खान्देश आणि विदर्भात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.(farmer-tension-rise-this-place-havy-rainfall-and-winter)

कडाक्याच्या थंडीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्टात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

येत्या २४ तासांत महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ४ अंशाने हळूहळू घसरण अपेक्षित आहे. देशातील दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यातील काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान कमी होत असल्यामुळे देशातील थंडी वाढणार आहे. या वातावरणातील बदलामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा इशारा दिला असून खान्देश आणि विदर्भात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.

या गारपिटीचा विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. भारतीय हवामान विभागाने हरियाणाच्या अलीगढ, नांदगाव, सिकंदराऊ, मथुरा, सादाबाद, तुंडला, आग्रा आणि कुरुक्षेत्र, कैथल येथे पावसाची शक्यता वर्तविली आहे.

भारतीय हवामान विभागाने राजस्थानमध्ये आज पावसाची शक्यता वर्तविली आहे. राजस्थानमधील अलवर, विराटनगर, लक्ष्मणगढ ,राजगढ आणि मेहंदीपूर बालाजीमध्ये पावसाची शक्यता आहे. सध्या उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडत आहे. जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात देशात ३१.२ मिमी पाऊस पडला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पाकिस्तानच्या सीमेवर स्थापन केली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती; पहा खास फोटो
‘आमच्या जीवाला धोका, आम्ही पळून जाऊन लग्न केलंय’, अज्याच्या पोस्टने उडाली खळबळ
‘बायको सोडून गेल्यानं मला सगळे मोदी म्हणतात’, पटोलेंनी उल्लेख केलेल्या ‘त्या’ गावगुंडाचा दावा

राज्य

Join WhatsApp

Join Now