अनेकजण हे आपल्या परिस्थितीतू बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक तर आपल्या जिद्दीने आपली स्वप्न पुर्ण करतात श्रीमंत होतात. त्यामध्ये अनेकजण असे असतात ज्यांना समाजासाठी आपण काही देणं लागतो असे वाटत नाही. पण त्याचवेळी काही लोक असेही असतात, जे समाजसाठी खुप काही करतात.
महाराष्ट्रात असे अनेक श्रीमंत लोक आहेत, जे समाजासाठी मोठ्या प्रमाणात दान करतात. पण आता एक वेगळाच श्रीमंत माणूस समोर आला आहे. समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतून त्या माणसाने त्याने अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असलेला हा माणूस शेतमजूर आहे. त्याने पत्नीसह इतरांच्या शेतात काम करुन वर्षभर पैसे जमा करतात आणि ते सरकारी शाळेला एक लाख रुपये देणगी म्हणून देतात. त्यांनी आधी ४० हजार रुपयांचे विद्यूत उपकरण शाळेत बसवून दिले होते.
मागील सात वर्षांपासून ते आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतीनिमित्त ६०० विद्यार्थ्यांना जेवण देतात. तसेच ते गावात वाचनालय सुद्धा चालवतात. या शेतमजूराचे नाव आत्माराम सोनवणे असे आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी गावातील रहिवासी आहे.
आत्माराम हे एका पत्र्याच्या खोलीत राहतात. त्यांच्याकडे एक गुंठा जमीन देखील नाही. ना त्यांच्याकडे नोकरी आहे. पण तरीही ते मेहनत करुन गावातील शाळेचे काम करताना दिसतात. त्यांनी एक लाख एक हजार रुपये देऊन इयत्ता दहावीसाठी ४० बाकडे बनवण्याचे काम सुद्धा सुरु केले आहे.
सोनवणे यांचा मुलगा गोपाळ होता. त्याचे २०१६ मध्ये निधन झाले होते. गोपाळ हा न्यायालयात सेवक होता. तो गेल्यापासून आत्माराम सोनवणे यांनी सरकारी शाळाच दत्तक घेतली आहे. काही लोकांकडे कोट्यवधी रुपये असतात. पण ते समाजाला काही रुपयांची सुद्धा मदत करत नाही. पण आत्मराम यांच्याकडे काहीच नसून ते समाजासाठी इतकं काही करत आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यपाल कोश्यारींचा जाता जाता शिंदे गटाला जोरदार दणका; वाचा आता नेमकं काय केलं
उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना अन् धनुष्यबाण गेले, शिंदेंचीच शिवसेना खरी; आयोगाचा मोठा निर्णय
शमी-अश्विनने कांगारूंना नाचवले, मग रोहित-राहूलने घेतली मजा; ऑस्ट्रेलिया २६३ धावांवर ऑलआऊट