सोलापूर | रोजच्या दैनंदिन जीवनात मोठ-मोठ्या घडामोडी घडत असतात. यामध्ये भीषण अपघाताचे प्रकार सर्वात जास्त पाहायला मिळतात. अशा अनेक भीषण अपघातात अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावे लागते. अशीच एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ फाट्याजवळील सोलापूर-मोहोळ या महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जागीच ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव मोहन दत्तात्रय आदमाने असून, त्यांचे वयवर्ष ५५ होते. आदमाने हे एक शेतकरी आहेत. आदमाने यांचा असा भीषण अपघात झाल्याने आदमाने कुटुंबीयांवर दुखांचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत तपास केला असता तेथील लोकांनी आरटीओ अधिकाऱ्यांची चूक असल्याचे सांगितले. कारण मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. त्यानंतर त्या कंटेनर माघून आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी आली. त्या अधिकाऱ्यांनी कंटेनर चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले त्यामुळे तो कंटेनर जागेवरच थांबला. कंटेनर अचानक जागीच थांबल्याने माघून येणारी टू-व्हीलर त्या कंटेनरला जावून धडकली त्यामुळे गाडीचालकाचा म्हणजे आदमाने यांचा जागीच मृत्यू झाला.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या अचानक येण्याने व त्यांच्या या हलगर्जीपणामुळेच या शेतकऱ्याचा जीव गेल्याचे आदमाने यांच्या नातेवाईकांनी तसेच तेथील ग्रामस्थान मंडळींनी सांगितले. हा अपघात होताच तेथील लोकांनी आदमाने यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आदमाने यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानुसार आरटीओ अधिकारी व कंटेनर चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर तिथे जमलेल्या संतप्त लोकांनी त्या आरटीओ अधिकाऱ्यांना बेदम चोप दिला. त्या हाणामारीत आरटीओ अधिकाऱ्यांपैकी तीन जन जखमी झाले. याबाबतची माहिती आरटीओच्या वायुवेग पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी सोनटक्के तसेच पोलीस निरीक्षक राजेश अहुजा आणि गाडीचालक शिवाजी गायकवाड हे तिघे जण मारहाणीत जखमी झाले असून त्यांनी याबतची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मी देशाच्या बड्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत रात्र घालवलीये; तहसीन पुनावालाचा खळबळजनक खुलासा
जबरदस्त! १२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, तुम्ही घेतला का ‘हा’ शेअर ?
‘काश्मिर फाईल्स’ गंगुबाई काठियावाडीचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर, चौथ्या दिवशीही जबरदस्त कमाई
‘हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात जाणार नाही, कायदेशीर लढा देणार’, मुस्लिम मुलींचा निर्णय