Share

sasun : “मी जगलो काय अन् मेलो काय फरक पडत नाही, डॉक्टरसाहेब माझी किडनी घ्या अन् मला दीड लाख द्या”

bhida adagale

farmer in sasun hospital  | शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो. कर्ज घेऊन फेडता न आल्यामुळे शेतकरी अनेकदा धक्कादायक निर्णय घेताना दिसून येतात. कर्ज फेडता न येत असल्यामुळे काही शेतकरी हे आपला जीवही देतात. पण पुण्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

कर्ज फेडण्यासाटी एक शेतकरी थेट डॉक्टरांकडे पोहचला आहे. तसेच आपल्याला आपली किडनी विकून पैसे फेडायचे असल्याचे त्याने म्हटले आहे. माझी किडनी घ्या अन् मला दिड लाख रुपये द्या अशी मागणी तो शेतकरी डॉक्टरांकडे करताना दिसून येत होता.

डॉक्टरसाहेब, माझ्या मुलींच्या लग्नासाठी मी काही वर्षांपूर्वी लोकांकडून कर्ज घेतले होते. त्यातील एका व्यक्तीच्या शेतीवर काम करत मी त्याचे पैसे दिले. इतरांचे राहिले आहेत, पण आता काम होत नाही. त्यामुळे माझी किडनी मला विकायची आहे. ती तुम्ही घ्या आणि मला दीड लाख रुपये द्या, असे शेतकऱ्याने म्हटले आहे.

हा शेतकरी साताऱ्याचा आहे.तो ससून रुग्णालयात आला होता. भिका अडागळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. भिका अडागळे हे ससूनमधील अपघात विभागात आले होते. तेव्हा डॉक्टरांना वाटले की कोणती तपासणी करायची आहे. पण माझी किडनी घ्या आणि दीड लाख रुपये द्या अशी मागणी ते करताना दिसून आले.

कायद्याने असे काही करता येत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितले. पण अडागळे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. भिका अडागळे यांच्या या अजब मागणीमुळे डॉक्टरांनाही धक्का बसला होता. पण शेवटी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकांकडून त्यांना समजावून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भिका अडागळे यांना दोन मुली आहेत. त्यांची लग्न झाली असून त्यांच्या लग्नासाठी त्यांनी पैसे घेतले होते. सर्व पैसे परत करु न शकल्याने सावकारही त्यांना त्रास देतात. सावकराला घाबरुन त्यांनी कोणाकडे तक्रारही केलेली नाही.

भिडा अडागळे म्हणाले की, मी सावकारांचे ७५ हजार रुपये परत केले आहे. पण अजूनही त्यांना दीड लाख रुपये द्यायचे आहे. पण आता कामही होत नाही आणि सावकारांचा त्रासही सहन होत नाही. त्यामुळे मी किडनी विकण्यासाठी इथे आलो होतो. मी जगलो काय अन् मेलो काय कोणालाही काही फरक पडत नाही.

महत्वाच्या बातम्या-
नुसती ताडतोड! ‘या’ फलंदाजाने फक्त 33 चेंडूत हादरवली दुबई, गोलंदाजांची कत्तल; पहा व्हिडीओ..
Suryakumar yadav : जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही सूर्या टीम इंडियातून बाहेर, ‘या’ कारणांमुळे BCCI ने घेतला मोठा निर्णय
तिकडे वडील टिळा लावत होते; इकडे मुलगी लग्नमंडपातूनच प्रियकरासोबत झाली फरार

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now