बिहारच्या पालीगंजमध्ये शेतात नांगरणी करताना गोणी भरून पैसे मिळाल्याची घटना समोर आली आहे. शेतात जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा होत्या. शेतात पैसे असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोक शेताकडे धावले होते. तिथल्या सर्व नोटा लोकांनी पळून लावल्या जेव्हा तिथे पोलिस पोहचले, तेव्हा फक्त फाटक्या नोटा तिथे पडलेल्या होत्या. (farmer ajay singh money)
संपूर्ण घटना पासौदा गावातील आहे. पावसाळा सुरू झाल्याने परिसरात मशागतीची कामे सुरू झाली आहेत. भातशेतीसाठी शेतकरी आपली शेतं तयार करण्यात व्यस्त आहेत. शेतांची नांगरणी सुरू आहे. पासौदा गावातील शेतकरीही उत्साहाने शेत नांगरणी करत आहेत. सोमवारी पासौदा गावातील शेतकरी अजय सिंग यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी केली जात होती.
त्यावेळी ड्रायव्हर वेगाने शेत नांगरत होता. अशात ट्रॅक्टरमध्ये एक गोनी अडकली अन् ती फाटली. त्याच्यातून ५०० आणि १००० च्या जूना नोटा पडल्या. काही वेळातच ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा शेतात पसरल्या. ते पाहून त्याने ट्रॅक्टर थांबवला आणि शेतात पडलेल्या नोटा गोळा करायला सुरुवात केली. मात्र या नोटा जुन्या झाल्या असून त्याचा आता उपयोग नाही हे समजताच त्यांनी ही बातमी गावकऱ्यांना दिली.
शेतात पैशांनी भरलेली पोती असल्याची बातमी मिळताच तेथे गर्दी झाली. लोक तिथून नोटा घेऊन पळवू लागले. दुसरीकडे गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सिगोडी पोलिस शेतात पोहचेपर्यंत तिथे असलेल्या गावकऱ्यांनी जमेल तेवढी रक्कम लुटली होती.
पोलिस येईपर्यंत फाटलेल्या जुन्या पोत्यांशिवाय एक रुपयाही शेतात शिल्लक नव्हता. गोणीत भरलेली रक्कम कोट्यवधीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संदर्भात सिगोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज कुमार यांना विचारणा केली असता, शेतात पैसे सापडल्याची वस्तुस्थिती स्वीकारत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचे सांगितले.
तसेच एसएचओच्या म्हणण्यानुसार, शेतात जुन्या नोटा कोठून आल्या हे शोधण्याचाही पोलिस प्रयत्न करत आहेत. या नोटा कोणाच्या होत्या? सध्या पोलिसांकडून लुटमार करणाऱ्या प्रत्येक ठिकाणी छापे टाकून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
काॅंग्रेस राष्ट्रवादीमुळे नाही, तर ‘या’ गोष्टीचा राग शिंदेंच्या डोक्यात होता, त्यामुळे त्यांनी बंड केलं
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती चांगले? काँग्रेसने पुरावे देत केलं कौतूक
एका निर्दोष जीवाला हानी पोहोचवणे म्हणजे.., उदयपुर घटनेवर इरफान पठाण संतापला