Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० विश्वचषकातील ३५ वा सामना एडिलेडमध्ये खेळला जात आहे. दोन्ही संघ २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील चौथा सामना खेळत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जो संघ जिंकेल तो थेट पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर जाईल.
यावेळी बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याने २ धावांवर त्याची विकेट गमावली. त्यानंतर आता सोशल मीडियावर हिटमॅनवर चाहते संताप व्यक्त करत आहेत.
रोहित शर्मा आणि केएल राहुल बांगलादेशविरुद्ध भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. गेल्या वेळेप्रमाणे या सामन्यातही दोन्ही खेळाडूंनी अत्यंत संथ फलंदाजी केली. त्याचवेळी रोहित शर्मा दडपणाखाली आला आणि त्याने घाईघाईने खेळण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर हसन महमूदने तस्किनच्या तिसऱ्या षटकात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर रोहित शर्माचा झेल सोडला. पण रोहित शर्माला या संधीचा फायदा घेता आला नाही. पुढे झेल सोडणाऱ्या हसन महमूदनेच रोहित शर्माची २ धावांवर विकेट घेतली.
रोहित शर्मा २ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कारण याआधीही रोहित पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणतीही मोठी इनिंग खेळू शकला नव्हता. त्यामुळे चाहत्यांनी ट्विट करत रोहित शर्माला चांगलेच फटकारले आहे.
https://twitter.com/dustybun05/status/1587720838861946880?t=XhDU4e3snXN-usHliGssOw&s=19
याबाबदल एका युजरने ट्विट केट लिहिले की, “फलंदाजी करणे विसरला.” तसेच दुसर्या यूजरने लिहिले की, “प्रत्येक सामन्यात संघर्ष करत आहे”. रोहित शर्माच्या खेळीमुळे चाहते खूप नाराज आहेत. ते सतत त्यांच्या ट्विटद्वारे नाराजी व्यक्त करत आहेत.
https://twitter.com/imshuhaib18/status/1587720801058689025?t=txqZ7vEcry-PF_sJBeAKgQ&s=19
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1587720684511186945?t=eIrGH8EmrYUg9SJfIL2a-A&s=08
महत्वाच्या बातम्या
KL Rahul : खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहूलची संघातून होणार हकालपट्टी? द्रविड म्हणाला…
T20 World Cup : … म्हणून न्युझीलंड दौऱ्यावर विराट-रोहितला विश्रांती देण्यात आली; निवडकर्त्यांचा केला मोठा खुलासा
shivsena : सत्ता गेली तरी पक्षाला लागलेली गळती थांबेणा; मातोश्रीचा निष्ठावंत नेता शिंदे गटात सामील
shivsena : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार; सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर घटनातज्ञांनी स्पष्टच सांगीतलं