Share

RRR चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी चाहत्यांनी केली थिएटरची तोडफोड; व्हिडिओ आला समोर

शुक्रवारी दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटावरुन सिनेमागृहात गोंधळ पाहिला मिळाला आहे. सोशल मिडीयावर चित्रपटासंबंधीत काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओतून चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी सिनेमागृहात तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी जमल्यानंतर “काही तांत्रिक अडचणीमुळे चित्रपट दाखवण्यात येणार नाही” असे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त होऊन प्रेक्षकांनी सिनेमागृहात तोडफोड केली. याकारणाने सिनेमागृहातील वातावरण चांगलेच तापले. शेवटी याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तोडफोड करणाऱ्या प्रेक्षकांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान आरआरआर चित्रपटावर प्रतिक्रिया देणारे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आश्चर्यचकित करणारी कमाई केली आहे. विशेष म्हणजे आरआरआरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

भारताबाहेर ही आरआरआरने चांगली कमाई केली आहे. सांगण्यात येत आहे की, आरआरआरने तामिळनाडूमध्ये १० कोटी, कर्नाटकात १४ कोटी, केरळमध्ये ४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात आजवर कोणत्याच चित्रपटाने पहिल्याच दिवशी एवढा गल्ला केला नाही. आरआरआरने बॉक्सवरील सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे.

व्यापार विश्र्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आरआरआरने एका दिवसात २.४० कोटी रुपये जमा केले आहेत. तर यूएसमध्ये २.३८ लाख युरोपी कमाई केली आहे. यासोबतच उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये चित्रपटाने २६.४६ कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.

भारताबाबत सांगयाचे झालेच तर, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला देशभरातील ५ हजार स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या भूमिकेने सर्वांना भूरळ पाडली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री आलिया भट्टच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या
27 रुपयांच्या या शेअरने दिला आश्चर्यकारक परतावा, 1 लाखाचे झाले 87 लाख, गुंतवणूकदार मालामाल
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राच्या बहिणीचं प्रसिद्ध दिग्दर्शकाशी आहे खास नातं, जाणून तुम्हालाही बसेल धक्का
‘मंत्रालयात जाताच लता दीदींची गाणी वाजायला हवीत’ राज ठाकरेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी, काय आहे नेमकं प्रकरण
कश्मीर फाईल्ससह सर्वच चित्रपटांवर चारीमुंड्या चीत करत RRR चा बाॅक्स ऑफीसवर जलवा; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now