Share

आमिर खान आणि जुही चावलावर झाली होती दगडफेक; ‘असा’ वाचवला होता स्वत:चा जीव

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान मिळवले. आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. असाच एक अभिनेता आहे ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. इतकेच काय तर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट देखील केले आहेत. तसेच त्याला त्याच्या कामामुळे एक नाव देखील दिले आहेत.

तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान होय. या नावामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. आमिर खान जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट आणतो तेव्हा तो हिटमधून सुपरहिट होतो. त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

खरंतर आमिर खान हा ९० च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत ही त्याने काम केले आहे. ज्यांच्यासोबत त्याची जोडीही चाहत्यांना खूप आवडते. यामध्ये एका अभिनेत्रीचे नाव अवरजून घेतले जाते. ती म्हणजे अभिनेत्री जुही चावला.

आमिर खानने आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९८८ मध्ये केले होते. त्याचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ हा होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जुही चावला देखील होती. आमिरचा हा पहिलाच चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच आमिर खान आणि जुही चावलाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

तसेच या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटानंतर ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा दिसून आली. मात्र या चित्रपटात जुही चावलाची छोटीशी भूमिका होती. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायक उदित नारायण आणि गायिका अलका याज्ञिक यांनी या चित्रपटात गायले होते. यांच्याशिवाय राज जुत्शी यांनीही करिअरच्या सुरुवातीच्या काळात या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात राज यांनी आमिरच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर राजने आमिरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी ‘लगान’ हा एक आहे. तसेच राज जुत्शी यांनी एक मुलाखतीत ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एक जुना किस्सा सर्वांसोबत शेअर केला.

राज यांनी सांगितले की, “प्रेक्षक चित्रपटाबद्दलची आपली आवड दाखवत होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी टीम प्रमोशनसाठी सर्व चित्रपटगृहांमध्ये जात होती. याच दरम्यान बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम पोहचले. याच दरम्यान आयोजक पुढच्या थिएटरला जायचे आहे, याची आठवण करून देण्यासाठी मंचावर आले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या लोकांना असे वाटत होते की, आम्ही जाऊ नये.”

राज पुढे म्हणाले की, “तिथे उपस्थित लोक चिडले असते. म्हणून सिनेमा हॉलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मागच्या दाराने बाहेर येण्यास सांगितले. मी आणि मन्सूर सर ड्रायव्हरसोबत गाडीच्या पुढच्या सीटवर बसलो होतो. आमिर आणि जुही मागे बसले होते. सिनेमा हॉल एका इमारतीत होता. जिथे अनेक खाजगी कार्यालये देखील होती. आम्हाला बाल्कनीतून मागच्या वाटेने बाहेर येताना पाहून लोक संतापले.”

याचबरोबर राज पुढे म्हणाले की, “जेव्हा आम्ही सर्वजण त्या इमारतीच्या गेटमधून बाहेर पडू लागलो. तेव्हा लोकांनी आमच्या गाडीवर विटा आणि दगड फेकायला सुरुवात केली. त्यामुळे काच फुटली आणि त्याचे तुकडे आमच्या अंगावर पडले. आम्ही ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवायला सांगितलं आणि कसेबसे तिथून सुखरूप बाहेर पडलो.”

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now