आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मराठमोळ्या कलाकारांनी तर सोशल मीडियावर सन साजरी करतानाचे फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासगळयात अभिनेत्री श्रद्धा कपूरही गुढीपाडवा सण साजरी करताना दिसली आहे.
श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसत आहे. श्रद्धाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक नऊवारी साडी नेसली आहे. या साडीत ति खूपच सुंदर आणि गोड दिसत आहे.
श्रद्धाने शेअर केलेला या फोटोमध्ये तिने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. यासोबतच हातात बांगड्या आणि गळ्यात पारंपरिक दागिने घातले आहेत. इतकेच नव्हे तर, यावेळी तिने नाकात शोभेल अशी नथ घातली आहे.
त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले आहे. श्रद्धाचा हा पारंपारिक लोक पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. यापूर्वी देखील श्रद्धा महाराष्ट्रीयन सन साजरे करताना दिसली आहे. श्रद्धाची आई महाराष्ट्रीयन असल्यामुळे तिला या सणांची गोडी आहे.
याचबरोबर श्रद्धाला साडी नेसायला ही खूप आवडते. त्यामुळे ति अशा सणावारांना हमखास सुंदर अशा साडीतच दिसते. सध्या श्रद्धाने महाराष्ट्रीयन लूकमधील फोटो शेअर केल्यामुळे तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तसेच महाराष्ट्रीयन सण साजरी केल्यामुळे तिचे अनेकांनी कौतुक केले आहे. श्रद्धाचे महाराष्ट्रीयन लूकमधील घायाळ करणारे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिच्या या महाराष्ट्रीयन लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘दिलेली शिक्षा भोगायला तयार’ ऑस्करमधील वादानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ‘या’ संस्थेतून झाला पायउतार
..त्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी आणि अजित दादांना लाख लाख धन्यवाद, उद्धव ठाकरेंनी केले कौतुक
KKR Vs PBKS च्या मॅचमध्ये रसेलने मारले ८ सिक्सर पण चर्चा मात्र सुहाना खानचीच; व्हायरल झाले बोल्ड फोटो
वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलचा मृत्यु घातपाताने की..? पोस्ट मार्टम रिपोर्टमधून मृत्युचे खरे कारण आले समोर