सोशल मीडियावर सध्या आपल्या बोल्ड लुकने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, विदिशा श्रीवास्तव होय. विदिशा श्रीवास्तव नेहमीच तिचे हटके फोटो इन्स्टग्रामवर टाकत असते. तिच्या फोटोला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. नुकतेच तिने तिचे आणखी काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत, जे पाहून तुम्ही हैराण व्हाल.
विदिशा श्रीवास्तव आता ‘भाभीजी घर पर हैं’ या शोमध्ये अनिता भाभीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेत तिला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिची शोमधील अनिता भाभीची व्यक्तिरेखा खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.
विदिशा श्रीवास्तव अनिता भाभीच्या पात्रासाठी योग्य असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. एकीकडे अनिता भाभी बनून ती चाहत्यांना वेड लावत आहे, तर दुसरीकडे तिच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या अदा पाहून लोक हैराण झाले आहेत. तिच्या पोस्टला अनेक लाईक्स मिळतात.
विदिशा श्रीवास्तव बद्दल अधिक माहिती म्हणजे, विदिशाने साऊथच्या चित्रपटांमध्ये खूप काम केले आहे आणि कदाचित हेच कारण आहे की तिला कोणीही स्टाईलमध्ये मात देऊ शकत नाही. विदिशाने 2007 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. चित्रपटांव्यतिरिक्त विदिशाने टीव्ही इंडस्ट्रीतही खूप काम केले आहे.
2017 मध्ये, तिला पहिला शो ये है मोहब्बतें ऑफर करण्यात आला. याशिवाय ती मेरी गुडिया, श्रीमद भागवत महापुराण, कहा हनुमान जय श्री राम या गाण्यात दिसली आहे. विदिशा श्रीवास्तवला स्टाईलमध्ये राहायला आवडते आणि ती अनेकदा सोशल मीडियावर स्टायलिश फोटो पोस्ट करत असते.
विदिशाने बर्याच तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. विदिशा एक उत्तम गायिकाही आहे. अभिनय करण्यापूर्वी विदिशाने मॉडेलिंगही केली आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथील आहे. तिचा जन्म 28 एप्रिल 1986 रोजी झाला. सध्या तिच्या करिअरला चांगले वळण आले आहे.