इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) चा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) सोबत होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ समोरा-समोर आहेत. सामन्यातील अपेक्षेनुसार, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांनी 67 धावांवर चार विकेट गमावल्या.(fans got angry after dropping the catch)
आयपीएल (IPL) 2022 च्या 20 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) 3 धावांनी पराभव करून पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. राजस्थानने लखनौसमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते परंतु केएल राहुलचा संघ या लक्ष्यापेक्षा 3 धावांनी मागे पडला. मात्र, लखनऊच्या या पराभवाचे पोस्टमॉर्टम केले तर अनेक कारणे समोर येतील, मात्र या पराभवासाठी कृणाल पांड्यालाच चाहते दोषी मानत आहेत.
होय, राजस्थानच्या फलंदाजीदरम्यान, क्रुणाल पंड्याने शिमरॉन हेटमायरचा एक सोपा कॅच सोडला. कृणाल पांड्याची ही चूक लखनौ सुपर जायंट्सला चांगलीच महागात पडली आहे. क्रुणाल पांड्याने हा कॅच सोडल्यानंतर शिमरॉन हेटमायरने अर्धशतक झळकावले आहे. त्यानंतर हेटमायर लखनौच्या गोलंदाजांसमोर तुफान फलंदाजी करत शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 36 चेंडूत 59 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकारही ठोकले. हेटमायरच्या या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानच्या संघाला 165 धावांपर्यंत मजल मारता आली.
तथापि, हेटमायर 14 धावांवर असताना, क्रुणालने लॉंग ऑनवर त्याचा सोपा कॅच सोडला, त्यानंतर हेटमायरने चौकार आणि षटकारांचा जोरदार पाऊस पाडला. या ड्रॉप कॅचसाठी चाहते क्रुणालला प्रचंड ट्रोल करत आहेत. पांड्यावर चाहते आपला राग कसा काढतात ते पुढील फोटो पाहून तुमच्या लक्षात येईलच.
https://twitter.com/padosiii/status/1513218173893443584?s=20&t=FCCpzWrE0JETKqR8o_zJdw
https://twitter.com/HarshaTarak8/status/1513216864045871110?s=20&t=eFlgrAGj-RWpEg-ATz5NHw
https://twitter.com/anup_s_nair/status/1513218112262668288?s=20&t=btZwHLIpNAaM0zjmOCfBRw
https://twitter.com/superking1814/status/1513216839152652294?s=20&t=oaBpMfVSHdhRBIfJ86R7uQ
https://twitter.com/CricketBlog38/status/1513216253350973443?s=20&t=H1Ak9hZUZak9x_sT1Un7vg
डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरला आयपीएल 2022 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 8.5 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात हेटमायरची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. 25 वर्षीय हेटमायर आयपीएलच्या शेवटच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. हेटमायरने आयपीएलमध्ये 35 सामने खेळले असून त्यात त्याने 685 धावा केल्या आहेत. यादरम्यान हेटमायरच्या बॅटमधून तीन अर्धशतके झळकली.