अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे वैयक्तिक आयुष्य तसेच कामाशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. अभिनेत्री अनुष्का शर्मा, जिने आपले फोटो बहुतेक साध्या लूकमध्ये शेअर केले आहेत, ती आता अलीकडील फोटोंमध्ये हॉट आणि सिझलिंग अवतारात दिसत आहे. तिचा हा नवीन अवतार इंटरनेटचा पारा चढवत आहे. (Anushka Sharma, Bold Look, Comment, Black Front Open Dress)
या खास फोटोंमध्ये, अनुष्का ब्लैक फ्रंट ओपन ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोंवर चाहते प्रचंड फिदा झाले आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटीही या फोटोंवरून नजर हटवू शकत नाहीत. तसेच अर्जुन कपूरपासून रिया कपूरपर्यंत अनेक सेलिब्रिटी अनुष्काच्या या नवीनतम फोटोंवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे सेलिब्रिटी देखील अनुष्काच्या या फोटोला कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. अनुष्काचे हे बोल्ड फोटो पाहिल्यानंतर अर्जुन कपूरपासून ते रिया कपूरपर्यंत सर्वांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “काळा रंग तुला अधिक आकर्षक बनवत आहे.” त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, ‘कोहली भैया अशा ड्रेसवर काहीही बोलत नाही?
अनुष्काच्या लूकची प्रशंसा तर आपण ऐकली आहे, पण आता आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या संपूर्ण लूकबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत. अनुष्काने थाई स्लिट ब्लॅक फ्रंट ओपन कटआउट ड्रेस परिधान केला होता. ओपन वेव्ही कर्ल केस, ग्लोइंग मेकअपमध्ये अनुष्का शर्मा खूपच सुंदर दिसत होती. बऱ्याच दिवसांनी अनुष्काचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ती या चित्रपटात दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा मला खुप राग येतो, अनुष्का शर्मासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीर सिंगने सोडले मौन
जेव्हा रणवीरने अनुष्का शर्माच्या प्रायवेट पार्टवर केली होती ही अश्लील कमेंट, अशी होती कोहलीची प्रतिक्रिया
अनुष्का शर्मासोबतच्या ब्रेकअपबाबत पहिल्यांदाच अभिनेत्याने सोडले मौन, म्हणाला, मला तिची आठवण येते
VIDEO: अनुष्कासाठी गिफ्ट घेण्यासाठी या बेकरीत गेला होता विराट कोहली, कोणीच नाही ओळखलं