fans angry on third umpire who gave dinesh karthik out | भारतीय क्रिकेट संघ टी २० विश्वचषक २०२२ मध्ये खुप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत भारतीय संघाचे तीन सामने झाले होते, तर आज चौथा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकत थेट सेमी फायनलमध्ये उडी घेतली आहे.
भारतीय संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत १८४ धावांची मोठी खेळी केली होती. या सामन्यात विराट कोहलीने आणि केएल राहूलने अर्धशतकीय कामगिरी केली आहे.
केएल राहुल ५० आणि विराट कोहलीने ६४ धावा केल्या आहे. तर सूर्यकुमार यादवने ३० धावांची आक्रमक फलंदाजी केली आहे. या सामन्यात एका मागोमाग एक विकेट्स जात होत्या. त्यामुळे दिनेश कार्तिक या सामन्यात चांगली फलंदाजी करेल असे वाटत होते. पण तो धावबाद झाला.
अशात अंपायरने धाव बाद दिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. धावबादच्या निर्णयावर चाहत्यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले. नॉन स्ट्राइक एंडला चेंडू गोलंदाजाच्या स्टंपला लागण्याआधीच हातातून पडताना दिसला होता. तरी अंपायरने कार्तिकला आऊट दिला.
https://twitter.com/sour_sweet98/status/1587738823999426560?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587738823999426560%7Ctwgr%5E27e8d3ebe6bfd634a7df42d791738604c0ff5f6e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida%2Ficc-t20-world-cup%2Find-vs-ban-t20-world-cup-viral-video-indian-fans-says-dinesh-karthik-was-not-out-third-umpire-blind-scsg-91-3230613%2F
झाले असे की १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाचा स्कोर १५० धावा होता. त्यावेळी कार्तिक धावबाद झाला. पण धावबाद होताना जेव्हा गोलंदाजाने स्टंप उडवले तेव्हा गोलंदाजाच्या हातात चेंडू नव्हता. त्यावेळी चेंडू आणि स्टंपमध्ये अंतर असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/kadak_chai_/status/1587741150135582721?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587741150135582721%7Ctwgr%5E27e8d3ebe6bfd634a7df42d791738604c0ff5f6e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida%2Ficc-t20-world-cup%2Find-vs-ban-t20-world-cup-viral-video-indian-fans-says-dinesh-karthik-was-not-out-third-umpire-blind-scsg-91-3230613%2F
थर्ड अंपायर काय आंधळा आहे का? असे एकाने म्हटले आहे. तर एकाने या धावबादचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये चेंडूच्या ऐवजी स्टंपला हात लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. धावबाद दिल्यामुळे दिनेश कार्तिकला ७ धावाच करता आल्या. जर तो मैदानात असता, तर भारतीय संघाला अजून चांगला स्कोर करता आला असता.
Not out…third umpire was blind#DineshKarthik pic.twitter.com/9yogiFrIcp
— 𝐏𝐚𝐫𝐯𝐞𝐬𝐡 𝐜𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐲🇮🇳 (@MeRanaParvesh) November 2, 2022
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट ठरली
VIDEO: ‘अल्लाह के बंदे’ हे गाणे गाताना गायकाने घेतला अखेरचा श्वास, कैलाश खेरही झाले भावूकIndia : बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारतासाठी आली आणखी एक मोठी गुड न्यूज; वाचून खुश व्हाल