Share

‘दोघांनी मिळून अंबानीला ३१ कोटींचा चुना लावला’, ईशान आणि रोहित शून्यावर बाद झाल्यावर चाहते संतापले

आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससोबत या सीजनमध्ये काय होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाचवेळा विजेत्या संघाने यंदाचा एकही सामना आतापर्यंत जिंकलेला नाही. गुरुवारी रात्रीही मुंबईने सीएसकेविरुद्धचा सलग 7वा सामना गमावला. या पराभवानंतर चाहत्यांना जितका राग मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावर आला, तितकाच राग मुंबई इंडियन्स संघातील आणखी एका खेळाडूवर आला आहे.(Fans angry after Ishaan and Rohit were dismissed for zero.)

रोहित शर्माशिवाय त्याचा सहकारी सलामीवीर इशान किशन हाही मुंबईच्या पराभवात मोठा खलनायक ठरला. या सामन्यात ईशानला खातेही उघडता आले नाही आणि मुकेश चौधरीच्या एका खतरनाक यॉर्करने त्याची विकेट उडवली. ईशानसाठी हे आयपीएल दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. या सीजनमध्ये जेव्हा संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असायची तेव्हा तो आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतायचा. आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांमध्ये त्याने केवळ 191 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Rahulc7official/status/1517147990489665538?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517147990489665538%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftrendbihar.com%2Fsports%2Fipl-2022-ishan-kishan-and-rohit-sharma-troll%2F

इशान किशनच्या या खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. यंदाच्या मेगा लिलावातील तो सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला होता. यामुळेच जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. मात्र ईशानने यंदा पूर्णपणे निराश केले आहे. ईशानच्या खराब परफॉर्मन्सवर लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने 16 कोटींमध्ये रिटेन केले आहे. याच इशान किशनला लिलावात 15.25 कोटींना विकत घेण्यात आले आहे. ज्या गोलंदाजाने या दोघांना पहिल्याच ओवरमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवले त्याच गोलंदाजाला चेन्नईने अवघ्या 20 लाखांमध्ये विकत घेतले, त्यामुळे दोन्ही खेळाडू रोहित आणि इशान किशनला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहूया.

https://twitter.com/Sudhanshuyarrrr/status/1517144777355001856?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517144777355001856%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftrendbihar.com%2Fsports%2Fipl-2022-ishan-kishan-and-rohit-sharma-troll%2F

https://twitter.com/brb_memes7/status/1517158269420142594?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517158269420142594%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftrendbihar.com%2Fsports%2Fipl-2022-ishan-kishan-and-rohit-sharma-troll%2F

https://twitter.com/awesonam/status/1517153868093689858?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517153868093689858%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftrendbihar.com%2Fsports%2Fipl-2022-ishan-kishan-and-rohit-sharma-troll%2F

मुंबई इंडियन्सला या सीजनमध्ये सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. टिळक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 155 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरादाखल, CSK ने 7 गडी बाद 156 धावा केल्या आणि IPL 2022 मध्ये त्यांचा दुसरा विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सने सामन्यावर ताबा मिळवला होता, पण अखेरच्या ओवरमध्ये विजय मिळवण्यात पटाईत असलेल्या धोनीने अखेरचे तेच जुना चमत्कार करून दाखवला.

महत्वाच्या बातम्या-
शेन वॉटसनने रोहित शर्माची घेतली क्लास, म्हणाला, या खेळाडूवर इतके पैसै खर्च का केले?
संघ रसातळाला जात असतानाही रोहित शर्मा चाहत्यांना देत होता खोटा आनंद, पहा व्हिडिओ
‘या’ खेळाडूवर फोडले रोहित शर्माने सलग पाचव्या पराभवाचे खापर, निराश होत म्हणाला
मुंबईला हारताना बघून रोहित शर्मावर संतापला हा दिग्गज खेळाडू; म्हणाला, जसप्रीत बुमराहच्या 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now