Share

‘कितने में बिके हो भाई’, अर्शदीपने लागोपाठ 3 नो-बॉल टाकताच संतापले चाहते; केला फिक्सिंगचा आरोप

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे दुसऱ्या टी-20 सामन्यात पुनरागमन झाला आहे. खराब फिटनेसमुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला दुसऱ्या T20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले.

पण पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अर्शदीप अत्यंत वाईट गोलंदाजी करताना दिसला, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. पुणे स्टेडियमवर सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने अत्यंत खराब कामगिरी दाखवली.

सुरुवातीच्या षटकांमध्ये त्याने भरपूर धावा खर्च केल्या. किंबहुना, श्रीलंकेच्या डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने बॅक टू बॅक तीन नो बॉल टाकले. अर्शदीपने षटकातील सहावा चेंडू नो बॉल टाकला. यानंतर संघाला फ्री हिट मिळाली. या फ्री हिटवर त्याने नो बॉलही टाकला आणि श्रीलंकेच्या संघाला आणखी एक फ्री हिट मिळाला. फ्री हिटचा हा चेंडूही नो बॉल राहिला.

एकूणच श्रीलंकेच्या संघाला तीन धावा मोफत मिळाल्या. त्याचवेळी कुसल मेंडिसने दोन नो बॉलवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. १९ व्या षटकातही त्याने २ नोबॉल टाकले. त्याचा फटका संघाला बसला. त्याची गोलंदाजी पाहून चाहते खूप नाराज झाले आणि सोशल मीडियावर त्याला ट्रोल करताना दिसले.

(IND vs SL) यांच्यातील दुसरा ट्वेंटी सामना अतिशय रोमांचक झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पाहुण्या श्रीलंका संघाने चांगली सुरुवात केली आणि भारताला ६ गडी गमावून २०७ धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात यजमान भारत संघाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही.

मात्र, अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांच्या मधल्या षटकांमध्ये वेगवान फलंदाजीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, ज्यामध्ये टीम इंडियाला २१ धावांची गरज होती. पण यजमान भारतीय संघाला हे लक्ष्य पार करण्यात यश मिळवता आले नाही. रोमांचक सामन्यात भारताचा १६ धावांनी पराभव झाला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगलीच झाली. सलामी जोडी पथुम निसांका (33) आणि कुसल मेंडिस (52) यांनी 80 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र युजवेंद्रने कुसलची विकेट घेत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले.

मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ डळमळीत दिसत असताना, दासुन शनाकाच्या धडाकेबाज खेळीने संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने फक्त 22 चेंडूत 56* धावांची धडाकेबाज खेळी केली. वानिंदू हसरंगाला खाते न उघडता उमरानने बोल्ड केले. कुसल आणि दसूनच्या अर्धशतकांमुळे पाहुण्या संघाने 207 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले.

पथुम आणि कुसल यांनी अर्धशतक झळकावत श्रीलंकेच्या संघाला शानदार भागीदारी करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. अशा स्थितीत फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी करत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करून दिले.

फिरकी गोलंदाजांच्या योगदानामुळे भारतीय संघाला 138 धावांत सहा गडी बाद करता आले. युझवेंद्र चहलला पहिला ब्रेकथ्रू मिळाला, तर अक्षरने दोन विकेट्स आपल्या नावावर नोंदवल्या. उमरान मलिकने भलेही तीन विकेट घेतल्या असतील, पण या काळात तो खूपच महागडा ठरला.

त्याने 4 षटके टाकत 48 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय अर्शदीप सिंग आणि शिवम मावी हेही चांगलेच महागात पडले. अर्शने 2 षटकात 37 धावा दिल्या, तर शिवमने 53 धावा दिल्या. धावा लुटण्याबरोबरच अर्शदीपने पाच चेंडूही टाकले. पाहुण्या संघाच्या दुसऱ्याच षटकात त्याने तीन नो बॉल टाकत 19 धावा लुटल्या. त्याच्या गोलंदाजीमुळेच श्रीलंकेच्या डावाला गती मिळाली.

https://twitter.com/SidheartSoni/status/1610995566590427136?s=20&t=kBRXJLjd1l6P9gHoZ0gMYw

https://twitter.com/Lareshhere/status/1610995596562944001?s=20&t=JZpd2eUBZbZc0JnipcVgjg

https://twitter.com/mr_sany_/status/1610995878466310145?s=20&t=XsoTXsVn-LpQSAZ_nw4DYw

 

https://twitter.com/CricketFantasyS/status/1610995872862711808?s=20&t=8cQmwXXEpxIC-Y7zJGqc0Q

https://twitter.com/Damn_xyzz/status/1610995857197010944?s=20&t=j33hiNSEI73YiG0qt0U_AA

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now