Share

दादूस झाला शेठमाणूस; विनायक माळीने खरेदी केली ‘एवढ्या’ लाखांची मर्सिडीज; म्हणाला, ‘घेतली एकदाची’

youtuber vinayak mali

आपल्या आगरी कोळी भाषेतील व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा विनायक माळी (youtuber vinayak mali) अर्थात दादूस शेठने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दादूसच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून यासंदर्भात त्याने सोशल मीडियाद्वारे ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. तर दादूसच्या घरी आलेली नवी पाहुणी म्हणजे कोणती व्यक्ती नसून नवीकोरी मर्सिडीज कार आहे.

विनायकने मर्सिडीज बेंझ सी क्लास ही कार घेतली असून त्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ‘घेतली एकदाची’ असे कॅप्शनही त्याने या व्हिडिओला दिलं आहे. विनायकने घेतलेली ही कार पाच दहा लाख नव्हे तर तब्बल ६२ लाखांची असल्याचे सांगितले जात आहे. इतक्या कमी वयात एवढी महागडी कार त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर घेतल्याने त्याच्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून लाईक आणि कमेंट करत त्याचे अभिनंदन करत आहेत.

विनायक माळीचा जन्म २२ सप्टेंबर १९९५ ला रायगड जिल्ह्यातील पनवेल इथे झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. त्याचे सगळे बालपण ठाण्यात गेले. त्याचे शिक्षण देखील ठाण्यातच झाले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विनायकने काही काळ नोकरी देखील केली. विप्रोसारख्या मोठ्या कंपनीत त्याने काम केले. पण इथे काम करत असताना विनायकला आरोग्यावर परिणाम होत होता. म्हणून त्याने ही नोकरी सोडली.

नोकरी सोडल्यानंतर विनायकने एलएलबीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. याच कालावधीत त्याने युट्यूबवर चॅनल बनवून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने हिंदीमधून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण यामध्ये त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने त्याच्या बोलीभाषेत म्हणजेच आगरी कोळी भाषेत व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे त्याला फार लोकप्रियता मिळत गेली.

खूप कमी वेळात विनायकने मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला आगरी कॉमेडी किंग म्हणून बोलवले जाते. त्याला युट्युबवरील कॉमेडीचा बादशहा असे म्हटले तरी त्यात काही वावगे वाटणार नाही. विनायकची प्रसिद्धी एवढी आहे की, अनेक मोठे कलाकार त्यांच्या चित्रपटांचे प्रोमोशन करण्यासाठी विनायकची मदत घेतात. त्यासोबतच त्याला अनेक कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या आहेत.

विनायक स्वतः त्याच्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहितो आणि त्याचे दिग्दर्शनही करतो. यासोबतच तो स्वतः त्यामध्ये अभिनेता म्हणून देखील काम करतो. विशेष म्हणजे विनायकचे सगळे व्हिडिओ आगरी कोळी भाषेतून असतात. म्हणून त्याचा अभिनय खूप नैसर्गिक वाटतो. आतापर्यंत विनायकचे ‘माझी बायको’, ‘दादूस सीरिज’, ‘दादूस निघाला गोव्याला’ असे अनेक व्हिडिओ हिट झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
Varsha Usgaonkar Birthday: वर्षा उसगांवकरने एकदा केलं होतं टॉपलेस फोटोशूट, झाली होती प्रचंड टीका
६०० एपिसोडपर्यंत शिव्यांचा अक्षरशः वर्षाव झाला; ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
आमिर खानने मराठी शिकण्यासाठी ‘या’ अभिनेत्याची घेतली होती मदत, स्वत:च खुलासा करत म्हणाला..

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now