केकेबॉलिवूडचे प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर के के यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. कोलकतामध्ये शो झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात आणण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके 53 वर्षांचे होते. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातही त्यांनी गाणी गायली आहेत. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केकेचा कार्यक्रम होता. याची माहिती त्यांनी स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर दिली होती. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
अरमान मलिकनेही पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, केके सर आता नाहीत यावर आम्हाला विश्वास बसत नाही. के के आता आपल्यामध्ये नाहीत याचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये. सोमवारीच प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाचा खुन झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी के के यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने पुर्ण देश हादरला आहे.
कोणालाच या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. केके हे बॉलीवूडचा टॉप-क्लास गायक होते ज्याने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि ज्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य केले होते. ९० च्या दशकात ‘यारो’ या गाण्याने ते प्रसिद्ध झाले होते. रोमँटिकपासून पार्टी गाण्यांपर्यंत सर्व गाणी त्यांनी गायली आहेत.
मात्र आता त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. केके हे बॉलिवूडचे गायक होते, ज्यांची गाणी कधीच जुनी झाली नाहीत. खुदा जाने हो, इट्स द टाइम टू डिस्को आणि कोई कहे कहता रहे यासारखी रोमँटिक गाणी आणि तडप तडप के इस दिल से यांसारखी दु:खी गाणी त्यांनी म्हटली आहेत.
केकेच्या त्यांच्या चाहत्यांच्या खूप आवडत्या गाण्यांपैकी ‘यारों’ची खूप चर्चा झाली. याशिवाय सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल’ या गाण्याने अनोखी छाप सोडली. त्याचबरोबर बचना-ए-हसीन चित्रपटातील ‘खुदा जाने’, ‘काइट्स’ चित्रपटातील ‘जिंदगी दो पल की’, जन्नत चित्रपटातील ‘जरा सा’, ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘तू ही मेरी शब है’ या गाण्यांनी त्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं.
याशिवाय ‘आँखों में तेरी अजब सी’, बजरंगी भाईजानमधील ‘तू जो मिला’, ‘इक्बाल’ चित्रपटातील ‘अशायेन’ आणि अजब प्रेम की चित्रपटातील ‘मैं तेरा धडकन तेरी’ गाणे. गजब कहानी त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होती. पण आता तो आवाज कायमचा शांत झाला आहे.
या बातमीने संपूर्ण गायनविश्व हादरले आहे. गायक जावेद अली म्हणाले की, मला आश्चर्य वाटत आहे, मला माझ्या मॅनेजरकडूनही या बातमीची माहिती मिळाली आहे. माझा मॅनेजर केकेच्या मॅनेजरचा मित्र आहे. त्यांनी ही दु:खद बातमी दिली आहे.






