Praveen Hingnikar: दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मृत्यू देखील झपाट्याने होत आहेत. वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. विदर्भाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर आणि त्यांच्या पत्नीचा मंगळवारी (दि.१८) भीषण कार अपघात झाला. हा अपघात दाम्पत्यासाठी जीवघेणा ठरला.
या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा (५२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर माजी क्रिकेटपटू प्रवीण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस मार्गावर कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
माध्यमातील वृत्तनुसार, ५६ वर्षीय निवृत्त क्रिकेटपटू प्रवीण कार चालवत होते. कारण हे जोडपे नागपूरहून परतत होते. त्यावेळी एक्सप्रेस वेवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या ट्रकला त्यांची जोरदार धडक झाली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पुण्यावरून नागपुरला जात असलेली क्रेटा कार आयशरला धडकली.
“ट्रक चालकाने आपले वाहन महामार्गावरील एका सावलीच्या ठिकाणी पार्क करून चूक केली. भरधाव वेगाने गाडी चालवत हिंगणीकर आहे होते. त्यावेळी समोर ट्रक चालू आहे कि बंद आहे. हे समजलं नाही. त्यामुळे ही धकड झाली. या प्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर नागरे यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, हिंगणीकर हे २०१८ पासून बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) मध्ये व्यस्त आहेत. सध्या ते BCB चे मुख्य क्युरेटर म्हणून काम करत आहेत. बीसीसीआयने जुलै २०१६ मध्ये घेतलेला लेव्हल-१ कोर्स पूर्ण करणाऱ्या १२ क्युरेटर्सपैकी एक होता. त्याच्या देखरेखीखाली, त्यांनी झहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम आणि कॉक्स बाजार स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार खेळपट्ट्या आणि आउटफिल्ड विकसित केले.
समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघात स्थळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये प्रवीण हिंगणीकर यांच्या कारची अवस्था अत्यंत वाईट झालेली दिसत आहे. तर त्यांच्या पत्नीचा मृतदेह कारच्या पुढील सीटवर पडलेला दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मला सलमान खानसोबत लग्न करायचय’; प्राजक्ता माळीने जाहीर केली इच्छा, कारणही सांगीतले, म्हणाली…
जेवून घ्या रे लेकरांनो, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा चिमुकल्यांना फोन; पोरं शोधत राहिली, आई सापडलीच नाही
अर्जुनच्या घातक गोलंदाजीने फिरवला सामना; बाप सचिन तेंडुलकरचा उर आला भरून, म्हणाला…