Share

KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

यश स्टारर केजीएफच्या(KGF) दोन्ही भागांमध्ये अँड्र्यूची भूमिका करणारा अभिनेता बीएस अविनाशचा एक्सीडंट झाला आहे. बुधवारी (29 जून) बेंगळुरूमध्ये त्याची कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने, अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली नाही.(famous-kgf-actors-horrific-accident-car-hit-by-truck)

त्यानी सोशल मीडियावर(Social media) प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. अविनाशने(Avinash) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की बुधवारी सकाळी तो त्याच्या मर्सिडीज-बेंझ कारने जिमला जात होता, पण एका वेगवान ट्रकने त्याच्या कारला धडक दिली.

त्याने लिहिले, ‘देवाच्या दयेने मला दुखापत झाली नाही. फक्त कारचे नुकसान झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

कारचा अपघात(Accident) झाल्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी धावले आणि त्यांनी बीएस अविनाशला कारमधून बाहेर काढले. साऊथ स्टार यशच्या केजीएफ सिरीजमध्ये अभिनेता अविनाशने स्थानिक टोळीचा बॉस अँड्र्यूची भूमिका साकारली होती.

KGF च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात त्याची भूमिका मोठी होती. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाशला दिवंगत अभिनेता चिरंजीवी सर्जा(Chiranjeevi Sarja) यांच्या माध्यमातून KGF या सुपरहिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

अविनाशने एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याने 2015 पासून ‘KGF: Chapter 1’ साठी प्रशिक्षण सुरू केले होते. केजीएफचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या, असा खुलासाही त्यानी केला.

KGF 2 चे दिग्दर्शन प्रशांत नील(Prashant Nil) यांनी केले होते. यामध्ये संजय दत्तनेही खलनायकाची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटात बॉलिवूडमधील रवीना टंडनचीही महत्त्वाची भूमिका होती. यात रॉकी भाई (यश) गोल्डमाईनचा राजा झाल्याची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींची कमाई केली. आता त्याच्या पुढच्या भागाची तयारी सुरू आहे.

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now