Share

प्रसिद्ध चित्रपट निर्माते संतापले, म्हणाले, ‘रियाची कोणतीही चूक नसताना तिचं करिअर उध्वस्त झालं’

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) हे नाव चित्रपटांतून मिळालं नसेल, पण सुशांत प्रकरणात तिचं नाव समोर आलं, त्यानंतर रियाला घरोघरी लोकं ओळखू लागले. सुशांतच्या मृत्यूपूर्वीच रिया चक्रवर्तीने तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती, मात्र या प्रकरणानंतर तिच्या करिअरचा आलेख खूपच खाली आला.(Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty, Bollywood career, Anjan Dutt)

आता पुन्हा एकदा रिया तिच्या फिल्मी करिअरला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. रिया लवकरच बंगाली चित्रपट निर्माता राणा सरकारसोबत काम करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे. प्रसिद्ध निर्मात्याने रियाबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. २०११ मध्ये अंजन दत्तच्या ‘रांझना आमी अर अश्बोना’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे चित्रपट निर्माते राणा सरकार यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी रिया चक्रवर्तीशी संपर्क साधला आहे.

राणा सरकारला वाटते की रिया त्याच्या चित्रपटासाठी योग्य आहे. OTTplay वर रियाबद्दल बोलताना ते म्हणाले की ते एका चित्रपटासाठी रियाच्या मॅनेजरच्या संपर्कात आहे, पण रियाने अजून निर्णय घेतलेला नाही. राणा सरकारने संभाषणात पुढे सांगितले की, आमच्याकडे स्क्रिप्ट तयार आहे आणि ती मुख्य कलाकारांमध्ये बसते. चित्रपट कथा विश्वासघाताशी संबंधित आहे. ते म्हणाले की रिया बंगाली चांगली बोलते आणि जर तिने हो म्हटले तर तिला खूप मदत होईल.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राणा सरकार पुढे म्हणाले की, मला वाटते की रियाची कोणतीही चूक नसताना तिचे करिअर धोक्यात आले आहे. ती खूप संकटातून गेली आणि अजूनही तिला मुंबईत भूमिका मिळत नाहीत. कुणाची तरी मैत्रीण आणि बंगाली असल्याने तिला त्रास होतोय. ते म्हणाले की मला वाटते की ती अधिक चांगल्यासाठी पात्र आहे.

रिया शेवटची २०२१ च्या मिस्ट्री थ्रिलर चेहरेमध्ये दिसली होती. रुमी जाफरी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी आणि सिद्धांत कपूर यांच्याही भूमिका होत्या. नुकतेच रियाच्या वाढदिवसानिमित्त राणा सरकारने सोशल मीडियावर रियाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने रियाला बंगाली चित्रपटसृष्टीत आमंत्रित करत वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहल्या. त्यांनी लिहिले की, ‘शो सुरू झाला पाहिजे. कोलकात्याला या आणि #BengaliCinema #Tollywood मध्ये आमच्याशी सामील व्हा.’

महत्वाच्या बातम्या-
पुरूषांनी फक्त हे काम केलं पाहिजे, जेव्हा रिया चक्रवर्तीने दिला होता रिलेशनशिबद्दल सल्ला
PHOTOS: सुशांतच्या पुण्यतिथीला भावूक झाली रिया, न पाहिलेले फोटो शेअर करत म्हणाली, मला रोज
अंकिता लोखंडेशिवाय या महिलांशीही होते सुशांतचे संबंध, चौथ्या नंबरवाली होती हृदयाच्या खूपच जवळ
या अभिनेत्रीच्या हाती लागला अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा १०० कोटी बजेटवाला चित्रपट 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now