प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसते. याचाच प्रत्यय नेहमीच आपल्याला येत असतो. बॉलीवूडमध्ये देखील अनेकदा आपल्याला पाहायला मिळते की, पती हा पत्नीपेक्षा लहान असतो किंवा पत्नी ही पतीपेक्षा लहान असते. हे आपण मागील अनेक दशकांपासून बॉलीवूड तसेच हॉलिवूडमध्ये बघत आहोत. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत हे कलाकार व्यवसायिक जीवनसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. अशाच एका अभिनेत्याबद्दल आज आपण या लेखात पाहणार आहोत. (famous-bollywood-actor-has-got-married-4-times)
अभिनेते कबीर बेदी (kabir bedi) यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केलेले आहे. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील जोरदार चर्चा सुरू असायची. त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चेनी नेहमीच जोर धरला होता. त्यांनी स्वत: त्यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द ऍक्टर’ या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सर्वांसोबत शेअर केले आहेत.
२९ वर्षांनी लहान पत्नी
अभिनेते कबीर बेदी यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रोतिमा बेदी (Protima Bedi) आहे. पहिली पत्नी असूनही कबीर बेदी यांना प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी खूप आवडायची. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीसोबत असलेले संबंध देखील तोडले होते. मात्र परवीन बाबी यांनी देखील त्यांच्यापासून लांब राहणं पसंत केलं.
त्यांनतर कबीर बेदी यांनी तिसरे लग्न केले. ते ही त्यांचे लग्न टिकले नाही. इतके होऊन ही त्यांनी चौथ्यांदा लग्न केले. यावेळेस मात्र त्यांची पत्नी ही त्यांच्यापेक्षा वयाने जवळजवळ २९ वर्षांनी लहान होती. योगायोग असा की, तिचे नावही परवीन होते. परवीन दोसांझ ही त्यांची मैत्रीण होती. परवीन दोसांझ यांच्या नावाशी संबंधित एक मनोरंजक किस्साही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शेअर केला आहे.
चौथ्या पत्नीचे बदलले नाव
कबीर बेदी यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात खुलासा केला आहे की, ‘त्यांना त्यांच्या चौथ्या पत्नीचे परवीन हे नाव बदलायचे होते. असे त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील सांगितले होते. पण परवीनला मात्र त्यांचा राग आला. परंतु नंतर जेव्हा त्यांना त्यामागचे कारण समजले तेव्हा ती शांत झाली.’ कबीर आता त्यांच्या पत्नीला ‘वी’ या नावाने हाक मारतात. कबीर पुढे असे ही म्हणाले की, ‘त्यांचे नाव आधीच परवीन बाबी यांच्याशी जोडलेले असल्याने ते हे नाव टाळत होते.’
अशी झाली पहिली ओळख
कबीर बेदी यांनी या पुस्तकात असे ही सांगितले आहे की, ‘त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांच्यामुळेच परवीन बाबी यांची भेट झाली होती. दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळेच कबीर बेदीचे पहिले लग्न मोडले. त्याचवेळी प्रोतिमा यांनी त्यांच्या ‘टाइमपास’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘कबीरला नवीन नातेसंबंध बनवण्यापासून ती रोखू शकली नाही, म्हणून त्याने काही काळानंतर त्यांची काळजी घेणे बंद केले.’