‘तेरा यार हू मै’ या मालिकेतील अभिनेत्री विभूती ठाकूर हीचा फोन नंबर सोशल मीडियावर लिक झाल्यामुळे तिला अनोळखी लोकांकडून शरीर सुखाच्या मागणीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे विभूती समोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी आणि या अज्ञात लोकांवर कारवाई करण्यासाठी विभूतीने सायबर पोलिसांची मदत घेतली आहे.
यासंबंधीत ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विभूतीने भावूक होत आपली आपबिती सांगितली आहे. हे सर्व कसं घडलं? नेमकं काय झालं? याबाबत मला अजिबात माहिती नाही. तसेच हा नंबर कोणी लीक केला? याचीही मला माहिती नाही. पण हे सर्व फार वाईट आहे. असे विभूतीने म्हटले आहे.
‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विभूतीने सांगितले आहे की, “कालपासून मला वेगवेगळ्या नंबरने फोन आणि मेसेज येत होते. आधी मला वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत थट्टा मस्करी करत आहे. पण त्यानंतर त्यातील काही विकृत लोकांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली, तेव्हा मात्र मला धक्का बसला. मी भावनिकरित्या खचले. मला मानसिक धक्का बसला. कारण आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही स्थितीचा सामना कधीही केला नव्हता.”
त्याचबरोबर, यानंतर मी एका कॉलरला फोन करुन या सर्व प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी मी त्याला नंबर कुठून मिळाला याबद्दल विचारले. तेव्हा त्याने मला एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तुमचा नंबर मिळालाअसल्याचे सांगितले. हा सायबर बुलिंगचा प्रकार आहे. यामुळे मी भावनिकरित्या अस्वस्थ झाली असल्याचे विभूतीने म्हटले आहे.
यानंतर तिने “अशाप्रकारे वाईट काम करणारे, अश्लील मेसेज आणि फोन करणाऱ्यांविरोधात मी तक्रार केली आहे. तसेच त्या संबंधित इन्स्टाग्राम पेज ज्याने माझा नंबर लीक केला, त्या पेजविरोधातही मी तक्रार दाखल करणार आहे. सायबर पोलीस यावर नक्कीच कारवाई करतील, याचा मला विश्वास आहे. माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या सर्व घटनेनंतर विभूतीने इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यातून तिने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. दरम्यान सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सर्वांत जास्त अभिनेत्री शिकार झालेल्या दिसून येतात. विभूती सोबत घडत असलेला प्रकार यातीलच एक भाग आहे
महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई, अलिबागमधील ८ प्लॉट, दादरमधील १ फ्लॅट जप्त, राजकारणात खळबळ
संतापजनक! शिक्षकाने केला १३ विद्यार्थिनींवर बलात्कार, ८ जणी गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार
अमित शहा लवकरच समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
इंधनाचे दर वाढवणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर