Neha Dhupia, Roadies Show, Bollywood Actress/ रोडीज शो दरम्यान, एका पुरुष स्पर्धकाने स्वतः बद्दल एक सत्य सांगितले होते. त्याने सांगितले होते की, त्याची मैत्रीणच त्याची फसवणूक करत आहे. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचे आणखी पाच मुलांसोबत संबंध असल्याचे सांगितले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने प्रेयसीला बेदम चोप दिला. यावर शोची जज नेहा धुपिया (Neha Dhupia) तरुणावर चिडली, ती म्हणाली, तुझी हिम्मत कशी झाली? यानंतर नेहा जे बोलली ते लक्षात राहण्यासारखे आहे.
नेहाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याच्या पोटी झाला. नेहाने 2002 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. नेहा धुपियाची करियर ऐवरेज राहिले आहे. नेहाच्या कारकिर्दीतील तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ती खूप चर्चेत आली आहे. रोडीज शो दरम्यान एका स्पर्धकावर प्रचंड राग काढला होता.
या शोमध्ये एका तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या फसवणुकीबद्दल सांगितले की, तिचे एकाचवेळी पाच मुलांसोबत अफेअर होते. यावर तरुणाने तिला जबर मारहाण केली. यावर नेहाला राग आला, तिने त्या तरुणाच्या प्रेयसीला जे केले ते तिची ‘चॉइस’ असल्याचे तिने सांगितले. यावर कोणीही हात उचलू शकत नाही. या प्रकरणी नेहा धुपियाला चांगलेच ट्रोल करण्यात आले.
त्या वेळी नेहा म्हणाली होती की, त्याला एखाद्या मुलीला थप्पड मारण्याचा अधिकार नाही आणि जर ती इतर पाच मुलांना डेट करत असेल तर ती तिची निवड आहे. कदाचित तिला तिच्या प्रियकराकडून धोका वाटत असेल. नेहाच्या या वक्तव्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
बॉलीवूड अभिनेत्रीशी निगडीत आणखी एक वाद आहे, नेहा धुपियाच्या #NoFilterNeha ला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सेलिब्रेटी येथे पाहुणे म्हणून शोमध्ये येताना दिसले आहेत. या शोमध्ये हे सेलिब्रिटी अनेकदा असे काही बोलतात की, त्यामुळे गोंधळ उडतो. अभिनेत्रीला तिच्या शोमध्ये शाहरुख खानला पाहुणे म्हणून आणायचे होते.
एकदा, हे करत असताना, तिने तिच्या शोमध्ये सांगितले होते की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोनच गोष्टी विकल्या जातात, एक सेक्स दुसरा शाहरुख खान. तिच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. असे अनेक छोटे-मोठे वाद नेहाशी जोडलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 10 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या आधीच होत्या प्रेग्नेंट, एक तर लग्न न करताच झाली होती आई
लग्नानंतर कतरिना-विकी कौशलने शेअर केला आणखी एक रोमँटिक फोटो, नेटकरी म्हणाले, ‘बेस्ट कपल’
‘चित्रपट सोड घरी बस’, प्रेग्नेंट झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीला निर्मात्यांनी थेट दिला होता नकार, वाचा किस्सा