Share

‘2 स्टेट्स’ मधून आपल्या अभिनयाने भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काल रात्री उशिरा बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

आज म्हणजेच 11 एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शिव कुमार यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या. त्यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर पटकथा लेखक म्हणूनही काम केलं. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयानं मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता.

शिवकुमार यांची ‘टू स्टेट्स’ या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. तसंच ‘परिंदा’ आणि ‘हजारो ख्वाइशे ऐसी’ या चित्रपटांसाठी शिव कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. नेटफल्किसवर प्रदर्शित झालेला ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

शिवकुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वाना धक्का बसला आहे कारण 2 महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांच्या चाहत्यांनी यामुळे दुःख व्यक्त केले आहे. शिवकुमार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघड झालेले नाही. त्यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी दिली आहे.

हंसल मेहता यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘आपणास कळविण्यात अत्यंत दु:ख होते, की आमचे प्रिय शिव सुब्रह्मण्यम यांचे निधन झाले आहे. मानवी रूपात राहणाऱ्या सर्वात आदरणीय आणि महान आत्म्यांपैकी ते एक होते. आम्ही त्यांची पत्नी दीया, आई, वडील, रोहन, रिंकी, भानू चिट्टी आणि शिव यांच्या कुटुंबीयांना मनापासून संवेदना व्यक्त करतो.

https://twitter.com/mehtahansal/status/1513336436736548870?t=6jjjS0IAF-bvWG4oGZI3gw&s=19

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी ट्विटरवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बीना सरवर यांनी ट्विट केले की, ‘खूप दुःखद बातमी. मुलगा जहाँच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा जहाँ याला ब्रेन ट्युमर झाला होता. 16 व्या वाढदिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now