नेहमीच भन्नाट लुकमुळे किंवा आपल्या वक्तव्याने चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘लॉक अप’ शो सध्या तुफान चालत आहे. या शो मधील स्पर्धकांचे वाद सोशल मीडियावर चर्चेत आहेत. असाच एक नवीन वाद निर्माण झाला आहे, सध्या त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
‘लॉक अप’ शो चे होस्टिंग कंगना रानौत करते. या शो मध्ये अनेक कलाकार हे एकमेकांचे स्पर्धक म्ह्णून लॉक अप टास्क करत आहेत. या स्पर्धकांमध्ये झालेल्या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यामुळे या शोच्या विरोधात अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘लॉक अप’ मध्ये असलेल्या स्पर्धकांची आपापसात भांडणं सुरू असताना एका अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला एका कलाकार स्पर्धकाने स्पर्श केला आहे. ही बाब व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे. यावर सध्या ‘लॉकअप’ शो च्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन स्पर्धकांमध्ये वाद सुरू आहे. मग अचानक हा वाद सोडवण्यासाठी स्टॅण्डप कॉमेडीयन मुनव्वर फारुकी त्यांच्यामध्ये पडतो आणि असं काही करतो ज्यामुळे या टीव्ही शोला अश्लीलतेचे स्वरूप आले. मुनव्वर भांडण सुरु असताना मध्ये येतो आणि स्पर्धक कलाकार अंजली आरोराच्या छातीवर हात ठेवतो.
हा व्हिडीओ समोर येताच वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शो सुरु होताच प्रचंड वादात सापडला आहे. वाढत्या वादांच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक कंगनावर प्रश्नही उपस्थित करत आहेत. सततच्या वादामुळे हा शो चर्चेत येत आहे. मात्र, अनेकांनी व्हिडीओला पाहून नको त्या गोष्टीला मसाला लावण्याची गरज नसल्याचं बोलले आहे.
या शो मधील अंजली आणि मुनव्वर या दोन स्पर्धकांची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दोघे एकमेकांना मैत्रीच्या नात्याने सांभाळून घेत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. अंजलीचा इतर स्पर्धकासोबत वाद चालू असताना मुनव्वरने तिला रोखण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्याचा हात चुकून तिच्या छातीवर गेला. यात अंजलीला देखील काहीच वेगळं वाटलं नाही.