अभिनेता स्वप्नील जोशीची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका नुकतीच झी मराठीवर सुरु झाली आहे. या मालिकेत स्वप्नील जोशीसोबत अभिनेत्री शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी मालिकेत अनामिका आणि सौरभचे पात्र निभावले आहे. एकेकाळी अनामिका आणि सौरभच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेम कहानीवर ही मालिका आधारित आहे.
तू तेव्हा तशी या मालिकेचे मोजकेच भाग प्रदर्शित आले असले तरी मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत अनेक नवे जुने कलाकार सहभागी झाले आहेत. अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले, अभिज्ञा भावे, सुहास जोशी या सुप्रसिध्द कलाकारांनी मालिकेत वेगवेगळी पात्रे निभावली आहेत.
महत्वाचे म्हणजे, या सगळ्यात मालिकेतून एक नवीन चेहरा समोर आला आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या मुलीने या मालिकेत आगमन केले आहे. चित्रलेखाची भूमिका साकारणारी ‘मीरा वेलणकर’ प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. नुकतीच या मालिकेच्या पुढील भागाची जाहिरात दाखवण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘मीरा वेलणकर’ चित्रलेखाची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे नुकतेच झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी एन्ट्री मारली आहे. सध्या या मालिकेत मोहन जोशी यांनी साकारलेली जगन्नाथ चौधरीची भूमिका आता प्रदीप वेलणकर साकारत आहेत. यामुळे झी मराठीवरील मालिकेत बाप लेकीने सोबत एन्ट्री मारल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
‘मीरा वेलणकर’ने जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून शिक्षण घेतले आहे. मीरा जाहिरात आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करते. यापूर्वी तिने मराठी मालिकेत काम केले आहे. मात्र मधल्या काळात तिने मालिका सृष्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तिने तू तेव्हा तशी मालिकेतून पुनरागमन केले आहे.
‘मीरा वेलणकर’ची बहिण बहिण मधुरा वेलणकर साटम ही देखील एक सुप्रसिध्द अभिनेत्री आहे. ती सध्या तुमची मुलगी काय करते या मालिकेत मुख्य भूमिका निभावत आहे. तिच्या या भूमिकेलाही चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान आता प्रदीप वेलणकर यांच्यासोबत त्यांच्या मुलींनेही मालिका विश्वात आगमन केले आहे. या तिघांच्या भूमिकेला चाहते पसंत करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
मल्टीबॅगर स्टॉक्सची कमाल! या ५ स्टॉक्सनी २ वर्षात दिला तब्बल ३४५०% परतावा, तुम्ही घेतले का?
RRR मधील ‘हे’ सीन्स पाहिल्यानंतर येतोय अंगावर काटा, वाचा प्रेक्षकांच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया
औषधांमध्येही महागाईचा दणका! पॅरासिटामाॅलसह ८०० औषधांच्या किंमती वाढणार
काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहा; ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला