Bollywood, Three Idiots, Arun Bali, passed away/ मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे निधन झाले. 79 वर्षीय अरुण बाली यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे.
अरुण बाली हे अनेक दिवसांपासून आजारी होते. अरुण बाली यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस (Myasthenia Gravis) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा स्वयंप्रतिकार रोग आहे. हा रोग नसा आणि स्नायू यांच्यातील कम्युनिकेशन फेलियरमुळे होतो.
अरुण बाली हे इंडस्ट्रीतील अनुभवी कलाकार होते, ज्यांच्या जाण्याने प्रत्येकजण भावूक झाला होता. अरुण बाली यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अरुण बाली एक आनंदी व्यक्ती आणि कलाकार होते. कोणत्याही भूमिकेत स्वत:ला कसे चांगले सामावून घ्यायचे हे त्यांना माहीत होते.
वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारने एका मुलाखतीत अरुण बालीच्या आजारपणाची माहिती दिली होती. नुपूर त्या वेळी CINTAA चीही सदस्य होती. नुपूरने अभिनेत्याविषयी बोलताना सांगितले की, त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. आपल्या सहकलाकाराची बिघडलेली प्रकृती पाहून नुपूरने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. यानंतर अरुण बाली यांच्या मुलीनेही त्यांच्या आजाराविषयी बोलताना सांगितले की, त्यांना ऑटोइम्यून आजार झाला आहे.
अरुण बालीने 90 च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘खलनायक’, ‘फूल और अंगारे’, ‘आ गले लग जा’, ‘सत्या’, ‘हे राम’, ‘ओम जय जगदीश’, ‘केदारनाथ’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 ईडियट्स’, ‘बर्फी’, ‘एयरलिफ्ट’, ‘बागी 2’, ‘पानीपत’, ‘केदारनाथ’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ते टीव्ही शोमध्येही सक्रिय होते.
अरुण बाली यांनी ‘फिर वही तलाश’, ‘दिल दरिया’, ‘देख भाई देख’, ‘महाभारत कथा’, ‘शक्तिमान’, ‘कुमकुम’, ‘देवों के देव महादेव’ आणि ‘स्वाभिमान’ सारख्या शोमध्येही काम केले आहे. मात्र त्यांना खरी लोकप्रियता कुमकुम या मालिकेतून मिळाली. शोमध्ये त्यांनी कुमकुम म्हणजेच जुही परमारच्या आजोबांची भूमिका साकारली होती. खेदाची गोष्ट म्हणजे आज अरुण बाली यांचा गुडबाय हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
महत्वाच्या बातम्या-
Mahesh Babu : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले दुःखद निधन
Mahesh Babu: महेश बाबूच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं, आईचे झाले निधन, चाहत्यांनी ‘तो’ जुना व्हिडीओ केला शेअर
Bhabhi ji ghar par hai : भाभीजी घर पर है मधील अभिनेत्यावर कोसळला दुखाचा डोंगर, अवघ्या १९ वर्षांच्या पोटच्या पोराचे निधन