Share

महाविकास आघाडीत बिघाडी! नाना पटोलेंनी अजितदादांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा स्थितीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार काँग्रेस आमदारांना त्रास देत होते असा खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर बंड पुकारले. दरम्यान, शिंदेसोबतच्या आमदारांनी खासदार संजय राऊत त्रास देतात असा आरोप केला. त्यानंतर नाना पटोले यांनी देखील अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असं विधान केलं. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, अजित पवार हे काँग्रेस आमदारांना त्रास देत होते. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला पैसे न देणे, त्यांना त्रास देणे, त्यांना निधी देत नव्हते असे प्रकार होत होते. त्यावर माझं असं मत होतं की, असे प्रकार चालणार नाहीत.

राज्यातील जनतेसाठी हे सरकार असून, कोणत्याही गटासाठी ते नाही. असे आम्ही ठामपणे सांगत होतो. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारावर अस्तित्वात आलेले आहे. सरकारने जनतेसाठी काम करावे, अशी आमची अपेक्षा होती. त्यातून आम्ही बोलत होतो.

तसेच म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आमची काही तक्रार नव्हती. आमचा व्यवस्थित समन्वय होता. त्यांच्या पक्षातील विषय आम्हाला माहीत नव्हता. मात्र, शिवसेनेतील बंडखोरीमागे ईडी आहे. कारण, त्या माध्यमातून विरोधातील लोकांना भीती दाखवली जात आहे. भारतीय जनता पक्षाचा हा खेळ आहे, असा आरोपही यावेळी पटोले यांनी भाजपवर केला.

भारतीय जनता पक्ष या बंडखोरीबद्दल का बोलत नाही. महाविकास आघाडी सरकार आजही मजूबत आहे. काँग्रेस संपूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. काँग्रेसमधील सर्व आमदार सुरक्षित आहे. आम्हाला सत्तेची लालचा नाही. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधातही बसायला तयार आहे. पण, आज तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत प्रामाणिकपणे राहायला तयार आहोत असे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now