Share

RCB मध्ये विराटची जागा घेणार फाफ डू प्लेसिस? प्रशिक्षकांनी दिली महत्वाची माहिती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचा आरसीबीमध्ये समावेश करण्याचे कारण सांगितले आहे. डु प्लेसिसच्या येण्याने केवळ फलंदाजीच मजबूत होणार नाही, तर त्याच्या नेतृत्व कौशल्याचाही संघाला फायदा होईल, असे बांगरने म्हटले आहे.(faf-du-plessis-to-replace-virat-in-rcb)

दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षीय फाफ डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super Kings) संघात आहे. आयपीएल मेगा लिलावात त्याला आरसीबीने विकत घेतले. संघाच्या लिलावानंतर संजय बांगर म्हणाला, ‘फाफ डू प्लेसिसच्या आगमनाने फलंदाजी खूप मजबूत होईल. तो एक हुशार खेळाडू आहे आणि तो नेहमीच सर्वोच्च स्तरावर चांगली कामगिरी करत आला आहे.

त्याला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे आणि त्याच्याकडे नेतृत्व कौशल्यही आहे.’ आरसीबीने श्रीलंकेच्या हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांना 10.75 कोटी रुपयांना आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला 7.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

संजय बांगर(Sanjay Bangar) म्हणाले, “आम्ही लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंबद्दल आनंदी आहोत. संघात स्थैर्य आणणे आणि टी-20 स्पर्धेत बदलत्या परिस्थितीनुसार वैविध्य आणणे हा आमचा उद्देश होता. प्रत्येक खेळाडूची संघात ठोस भूमिका असेल आणि आम्ही बॅकअपसाठी मजबूत खेळाडूही निवडले आहेत.”

आपल्या प्रमुख खेळाडूंबद्दल बोलताना ते म्हणाले, जोश हेझलवूडच्या आगमनाने गोलंदाजी मजबूत झाली आहे. त्याला या फॉरमॅटचा खूप अनुभव आहे. त्याच वेळी, हसरंगा सातव्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाज आणि एक उत्कृष्ट लेगस्पिनर आहे. सहाव्या क्रमांकावर, आमच्याकडे दिनेश कार्तिक चांगला फिनिशर आहे.

ते म्हणाले, “हर्षल पटेलने गेल्या सीजनमध्ये चांगली कामगिरी केली. त्याच्या परत येण्याने आम्हाला आनंद झाला आहे. एवढ्या वर्षात आम्ही ज्या खेळाडूंमध्ये पैसे गुंतवले ते खेळाडू परत मिळाल्याने बरे वाटते.” आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवले होते.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now