Share

फडणवीसांचे अतिरेक्यांशी संबंध; पुरावे देत भाजपच्याच माजी आमदाराची ईडीकडे धाव

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. यामध्ये अनेकांना अटक झाली आहे. ईडीने नुकतीच नवाब मलिकांना अटक केली आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच, राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला दाऊद संबंधित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारने खंडणी गोळा केल्या प्रकरणी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात तक्रार केली आहे. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. म्हणाले, जसं नवाब मलिकांना त्यांनी अतिरेक्यांशी संबंध असलेल्या माणसाकडनं जमीन घेतली म्हणून अटक केली. हा तर डायरेक्ट अतिरेक्याशीच संबंध असल्याचा मी तुम्हाला पुरावा दाखवतो. असे म्हणाले.

तसेच म्हणाले, ”कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला देशद्रोही व 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची आहे. त्याच्या संबंधित असलेल्या आरकेडब्लू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड चे मालक राकेश वाधवान यांच्या बँक खात्यातून फडणवीस सरकारला 2014 ते 15 मध्ये 10 कोटी रुपये देणगी देण्यात आली होती. राकेश वाधवान पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून सध्या तुरुंगात आहे” असे आरोप अनिल गोटे यांनी केले आहे.

तसेच म्हणाले, इकबाल मिरची दाऊदचा राईट हॅन्ड असलेल्याकडून पैसे घेतलेत. नवाब मलिकांना तुम्ही तिसऱ्या माणसाकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक करत असाल तर तुम्ही तर त्याच्याहीपेक्षा मोठे आरोपी आहात.  हे तर डायरेक्टच आहेत, असंही अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं.

तसेच म्हणाले, मलिकांना अटक केल्यानंतर मी संशोधन केलं, त्यात मला ही सनसनाटी माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर जबाबदार नागरिक म्हणून मी इथं आलो. ईडीनं आता यावरही कारवाई करावी. दर मंगळवारी फडणवीसांच्या काळात असलेल्या मंत्र्याची इथं येऊन तक्रार करणार आहे. पुराव्यानिशी तक्रार करणार आहे, असं अनिल गोटे म्हणाले.

नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,यांना ईडीकडून अटक झाली ,त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या मालमत्तेवर ईडीने छापा टाकला. यामुळे केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर सुरू असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now