मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईच्या बीकेसी मैदानात 14 मे रोजी जाहीर सभा झाली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अनेक मुद्यावरून निशाणा साधला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांवर यावेळी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
रविवारी देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कुठल्या आंदोलनात होता का? कुठल्या संघर्षात तुम्ही होता का?असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला.
म्हणाले, बाळासाहेब वाघ होतेच. पण आता एकच वाघ आहे आणि तो नरेंद्र मोदी. बीकेसी मैदानात झालेल्या उध्दव ठाकरेंच्या सभेबद्दल बोलताना म्हणाले, कालच्या सभेला मास्टर सभा, मास्टर सभा बोलले जात होते. पूर्ण सभा ऐकल्यावर वाटलं ही तर लाफ्टर सभा, लाफ्टर सभा आहे.
आम्ही फाईव्ह स्टारच राजकारण केलं नाही. आम्ही जमिनीवरच राजकारण केलं. सगळ्याबरोबर संघर्ष केला. सोन्याचा चमच्या घेऊन जन्म झाला नाही. बाबरी ढाचा पडत होती. तेव्हा शेपट्या, लाठ्या कोणी टाकल्या होत्या. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काल गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा झाली, त्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला म्हणाले, तुमचे मनोरंजन सुरू आहे पण सामान्य माणसाची होरपळ होत आहे. शेतकरी, ओबीसी, एसटी कर्मचारी, मराठे यांच्याकडे कोण पाहणार? सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही हे बरं झालं.
आणीबाणीच्या काळात सर्वांना तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्ही कुठे होतात? तर तुम्ही इंदिरा गांधींच्या बाजूने होता. तुमच्याकडे मुद्दे नसल्यास तुम्ही म्हणता की, मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचं षडयंत्र होतंय. कोणाचा बापाची हिम्मत आहे की मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचं. असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.