दिल्ली(Delhi): महाराष्ट्रात सध्या शिंदे फडणवीस सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात स्थान बळकट झाले आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात फडणवीसांना संधी देण्यात आली आहे.
फडणवीसांवर भाजपने आता नवी जबाबदारी म्हणून केंद्रीय निवडणूक समितीमध्ये त्यांचा समावेश केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या लिस्टमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. याआधीही एक यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्येसुद्धा नितीन गडकरी यांचे नाव नव्हते. सतत दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव नसल्यामुळे गडकरींना डावलले गेले आहे.
नितीन गडकरी यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचेही नाव वगळण्यात आले आहे. निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. फडणवीसांना केंद्रीय निवडणूक समितीमध्ये घेणे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सर्वात मोठी बाब आहे. दिल्लीमध्ये आता फडणवीसांची चांगलीच हवा झाली आहे.
या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील मुख्य भाजपच्या नेत्यांची नावं आहे. या समितीत आता एकही मराठी माणूस नाही. भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे.
आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठे पद दिले जात नाही. परंतु, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे. निवडणूक समिती ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी कोणती असावी, कुणाला संधी दिली पाहिजे, याबद्दल शिफारस करत असते.
केंद्रीय निवडणूक समितीच्या 15 सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित भाई शाह, बी. एस. येदयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेन्द्र यादव, देवेन्द्र फडणवीस, ओम माथुर, बीएल संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास ही आहेत.
महत्वाच्या बातम्या
(Monsoon sessions)दरवाजे अद्यापही खुले आहेत पण..; बंडखोर आमदारांसमोर आदित्य ठाकरेंनी ठेवली ‘ही’ अट
विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी द्यावी; राष्ट्रवादीची मागणी
भाजपला शिंदे गटाची गरज नाही?, प्लॅन बी वर काम सुरू; राजकीय वर्तूळात खळबळ
(Monsoon sessions): आले रे आले गद्दार आले, ५० खोके घेऊन ओक्के झालेले आले; शिंदे गटातील आमदारांचा सर्वांसमोर पाणउतारा