Share

Sachin Tendulkar : फडणवीसांनी स्वतःची तुलना थेट सचिन तेंडूलकरशी केली, म्हणाले सचिनप्रमाणे मी सुद्धा..

देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांनी मुलाखतीत मिशन गुवाहाटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्वकांक्षा यासंदर्भात प्रश्नांवर मनसोक्त उत्तरं दिली. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार आहे. तसेच २०२४ मध्येही आम्ही एकत्र निवडणूक लढू असं म्हटलं. मात्र यावेळी आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात चेहरा कोण असेल यावर खूप खिलाडू वृत्तीने उत्तर दिले.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात कोण चेहरा असेल यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक कॅप्टन चांगला परफॉर्मन्स देत आहे, मग आत्ताच प्रश्न का, सचिन तेंडुलकर मिलिनियर्संचा स्टार आहे, त्यांच्यासारखा फलंदाज होणे नाही. पण, त्यांचीही अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात क्रिकेट खेळलंय.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यातून राजकारणातील सचिन तेंडुलकर आपणच असल्याचं सुचवलं आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आपल्या शैलीत कौतुक देखील केले.

म्हणाले, एक टीम असते, आम्ही टीम बिजेपीचे कार्यकर्ता आहोत. आम्ही असे ऑलराऊंडर आहोत की, आम्हाला नाईट वॉचमन म्हणून जरी पाठवलं तरी आम्ही शतक ठोकणार, असे म्हणत फडणवीसांनी जणू उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यामागची पक्षनिष्ठा व्यक्त केली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे प्रपोजल माझं होतं. त्यामुळे, मी मुख्यमंत्री बनणार नाही, हे मला माहिती होतं. पण, मी बाहेर राहून काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बाहेर राहून सरकार चालत नाही, हे पक्षाने मला सांगितलं असे फडणवीस म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now