आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांचा म्हणजेच पार्थ पवारांचा जन्मदिवस आहे. यानिम्मिताने पार्थ पवारांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच पार्थ पवारांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये नितीन देशमुखांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा,” अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. आपल्या पोस्टमध्ये नितीन देशमुखांनी म्हटले आहे की, माझी आणि त्यांची साधारण आठ वर्षांपुर्वीची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात बसल्यानंतर माझा त्यांच्याशी परिचय झाला. १५ ऑगस्टच्या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईतील मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत संविधान बचाव रॅली काढली होती. माननीय आव्हाड साहेब आयोजकांपैकी एक होते.
पुढे त्यांनी, “याच रॅलीमध्ये पार्थ अजित पवार हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्यांच्या मागोमाग चालत होते. रॅलीच्या ठिकाणी मंचावर आदरणीय पवार साहेबांपासून ते अजितदादा, राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते होते. मात्र पार्थ अजित पवार एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यांची भाषणं ऐकत होते. तेव्हा मला ते माझ्यातलेच एक तरुण वाटले. २०१९ साली त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली.
साहजिकच त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीवर माध्यमांची नजर होती. भाजपचा आयटी-सोशल मीडिया विभाग देखील त्यांच्याविरोधात कमालीचा सक्रीय दिसला. पार्थदादा यांना नामोहरण करण्यासाठी जणू भाजपचा आयटी सेल फडणवीस पेक्षाही पार्थदादांवर जास्त नजर ठेवून होता.” अशा भाषेत पार्थ पवारांचे कौतुक केले.
https://www.facebook.com/109621837193462/posts/528095135346128/?app=fbl
यानंतर, “ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री मा. आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहतोय. त्याप्रमाणे पार्थदादांनाही एक फेअर चान्स मिळाला पाहीजे. मावळचे माननीय खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत.
त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे.” अशी मागणी नितिन यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “२००५ साली जेव्हा सन्माननीय सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते.” अशी इच्छा व्यक्त केली आहे.
सगळ्यात शेवटी, “राज्यातील युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पार्थ अजित पवार यांना पुढील लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून संधी द्यावी. तसेच श्रीरंग बारणे साहेबांना सन्मानाने सर्वमताने राज्यसभेची खासदारकी द्यावी. आम्हा तरुण कार्यकर्त्यांची हिच इच्छा आहे.” असे आवाहन नितीन देशमुख यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
महत्वाच्या बातम्या
दाम्पत्य विमानात चढलं आणि कोणीच नव्हतं, पुन्हा काऊंटरला जाऊन चौकशी करताच बसला धक्का
एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा.., काश्मीर फाईल्सवर आमिर खानने सोडले मौन
मुलीला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, तिने कोणते कपडे घालावेत याबाबत..
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेते ‘पवार सरकार”, शिवसेना खासदाराचा घरचा आहेर