Share

धर्मवीर’च्या कालच्या शोचे आकडे वाचून डोळे फिरतील; असा विक्रम केला जो आजवर कुणालाही नाही जमला

काल ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कालच्या दिवसाचे चित्रपटाचे शोज ऐकून तुमचे डोळे फिरतील.

या चित्रपटाचे काल 400 पेक्षा अधिक स्क्रिन्स आणि 10,000 हून अधिक शोज लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिकांनी या चित्रपटाच्या खास शो चे आयोजन देखील केले होते. चित्रपटाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रम रचला आहे.

नवी मुंबईत शिवसेना नेत्यांकडून सकाळी 9:30 च्या शो चे आयोजन करण्यात आले होते. आता पुण्यात आणि अहमदनगरमध्ये देखील या चित्रपटाचे खास आयोजन करण्यात येणार आहे. भिवंडीत सुभाष माने यांनी चित्रपटाच्या सो चे आयोजन केले होते. तसेच उल्हासनगरमध्ये युवासेनेतर्फे तर बदलापूरमध्ये देखील शिवसेनेतर्फे चित्रपट दाखवला जाणार आहे.

दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु ‘ धर्मवीर’ या चित्रपटाचे पोस्टर झळकलं आहे. ही बाब अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट शिवसेना नेते आणि बाळासाहेबांच्या अगदी निकटचे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण दरडे आहेत. यामध्ये आनंद दिघे यांची भूमिका मराठी अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे.

तर एकनाथ शिंदेंची भूमिका क्षितिज दाते यांनी साकारली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत. सध्या या चित्रपटाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, हा चित्रपट कमाई किती करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now