मित्रांनो, या धावत्या जगात क्रिकेट खेळण्याचे वय किती असेल. तुम्ही ४०-५० वर्षे म्हणाल, मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, T२० क्रिकेटमध्ये एका खेळाडूने वयाच्या ५७ व्या वर्षी पदार्पण केले आहे. तुमच्याप्रमाणे आम्हालाही हे ऐकून धक्काच बसला होता, पण ते खरे आहे. जिब्राल्टरचा क्रिस्चियन रोक्का नावाचा खेळाडू, ज्याने वयाच्या ५७ वर्षे ६६ दिवसांनी टी-२० मध्ये पदार्पण केले.(Cricket, Christian Rocca, World Cup)
इंग्रजीत एक म्हण आहे Age is just a number (वय म्हणजे फक्त एक संख्या…) ५७ वर्षीय क्रिस्चियन रोक्का यांना ही म्हण उत्तम प्रकारे शोभत आहे. वयाच्या ३५-४० व्या वर्षी, दिग्गज खेळाडू त्यांच क्रिकेट किट खुंटीवर टांगतात, रोक्काने डोळ्यावर चष्मा आणि जवळजवळ पूर्ण पांढरी दाढी ठेवून टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यांचे हे धाडस खरोखर वाखाणण्या योग्य आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ICC च्या १२ राष्ट्रीय बोर्डांव्यतिरिक्त (ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इ. प्रमुख आहेत) क्रिकेट खेळणारे काही सहयोगी देश देखील आहेत. त्यापैकी दोन देशांमधील व्हॅलेटा कपमध्ये, १३ मे २०२२ रोजी बल्गेरिया आणि जिब्राल्टर यांच्यात T२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. या सामन्यात, क्रिस्चियन रोक्काने जिब्राल्टरसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
त्यांचे वय ५७ वर्षे आहे. यासह टी-२० क्रिकेटमध्ये या वयात पदार्पण करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याआधी हा विक्रम तुर्कीच्या उस्मान गोकर (५९ वर्षे १८१ दिवस) आणि चेंगिज अक्युझ (५७ वर्षे ८९ दिवस) यांच्या नावावर होता. दुसरीकडे, देशाचा पहिला सामना खेळलेल्या खेळाडूंना वगळले, तर रोकाने सर्वात मोठ्या वयात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
या प्रकरणात, त्याने जिब्राल्टरच्या रिचर्ड कनिंगहॅमचा विक्रम मोडला, ज्याने २१ ऑगस्ट २०२१ रोजी माल्टाविरुद्ध वयाच्या ५१ वर्षे आणि १९१ दिवसांनी या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आम्ही तुम्हाला सांगतो की रोक्काचं आंतरराष्ट्रीय पदार्पण सचिन तेंडुलकरच्या आधीही झालं होतं. १९८६ च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत रोक्का जिब्राल्टर संघाचा भाग होता. त्या स्पर्धेत संघाने इस्रायलचा सहज पराभव केला आणि ब गटात आठवे स्थान पटकावले. झिम्बाब्वेने ती स्पर्धा जिंकली आणि विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आले हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्या स्पर्धेत रोक्काने ७ सामन्यात १३४ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
नगरच्या शेतकऱ्याची लेक आता महिला आयपीएल गाजवणार; गावातच घेतलेत क्रिकेटचे धडे
काय सांगता? या ५ क्रिकेटपटूंनी केली नाही समाजाची पर्वा, केलं थेट घटस्फोटित महिलांशी लग्न
राज कुमारी निखंज: ६ मुलांना एकट्याने वाढवलं, अन् भारताला मिळाला एक महान क्रिकेटपटू
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेला क्रिकेटपटू सायमंडस; आकडा वाचून डोळे पांढरे होतील