शिवसेना पक्षात नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेने रामदास कदम तसेच माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावर कडक कारवाई केली आहे. (Expulsion of ‘these’ veteran leaders from the party by Uddhav Thackeray)
मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्ष नेत्यांवर नाराज असल्याची कुजबुज होती. परंतु त्यांनी पत्र लिहून शिवसेनाप्रमुखांवर वेगवेगळे आरोप करत पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. याच कृतीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे.
रामदास कदम यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. माझी बाळासाहेब ठाकरेंनी पक्षनेते पदी निवड केली होती. परंतु आजकाल पक्ष नेत्याला फार किंमत पक्षात दिली जात नाही. हे मला पाहायला मिळालंय,’ अशा शब्दात मनातली खदखद त्यांनी पत्रातून व्यक्त केली.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सुद्धा शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे. आनंद अडसूळांवर काही दिवसांपूर्वी बँक घोटाळ्याचा आरोप झाला होता. याच आनंद अडसूळांचे सुपुत्र अभिजीत अडसूळ यांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थनाबाबत आधीच सूचक वक्तव्य केले होते.
‘मागील कित्येक वर्षांपासून एकनाथ शिंदे मंत्री असताना मी त्यांच्याकडे जायचो. तेव्हा रात्रीचे २ वाजता सुद्धा त्यांचे दरवाजे कायम माझ्यासाठी उघडे असायचे. त्यामुळे मी गट तट मानत नाही. शिंदेसाहेब दाखवतील त्या मार्गाने जाणारा मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे,’ अशा शब्दात अभिजीत अडसूळ यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा असल्याचे संकेत दिले होते.
रामदास कदम यांना कोकणातला शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाते. कोकणात राणेंना टक्कर देणारा हा शिवसेनेचा मोठा नेता आहे. आनंद अडसूळ हे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. अशा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी ही शिवसेनेची मोठी कारवाई मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
दोन गट एकाच पक्षाच्या चिन्हावर दावा करत असतील तर निर्णय कसा घेतात? काय सांगतो कायदा?
..अन् शहनाज गिलला पाहताच मुलगी झाली बेभान, गळ्यात पडून ढसाढसा पडली, पहा व्हिडीओ
प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐका अपघाताचा थरार! एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली