Share

दहशतवादी हल्ल्याचा पर्दाफाश; देशातील ‘या’ बड्या नेत्याला मारण्याचा ‘असा’ रचला कट

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी एजन्सीने (FSB) भारतात आत्मघाती हल्ला करण्याचा इरादा असणाऱ्या इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याचे लक्ष्य भारतातील एक वरिष्ठ नेता होता, ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

रशियन एजन्सीने सोमवारी सांगितले की, या दहशतवाद्याला भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बदला भारतातील सत्ताधारी गटाच्या एका प्रमुख नेत्याची हत्या करून घ्यायचा होता. एवढेच नाही तर या दहशतवाद्याने भारतात हल्ल्याचे विशेष प्रशिक्षणही घेतले होते.

एफएसबीने सांगितले की, या दहशतवाद्याला रशियातून भारतात जात असताना अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितले की हा दहशतवादी आत्मघाती बॉम्बर असू शकतो ज्याला आयएसने तुर्कीमध्ये भरती केले होते. या दहशतवाद्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथी बनवून तुर्कीमधील आयएसच्या प्रतिनिधीची भेट घेतली.

त्यानंतर इथेच त्यांनी भारतात जाण्यापूर्वी आपल्या मिशनबद्दल शपथ घेतली होती. या दहशतवाद्याचे लक्ष्य भारतातील सत्ताधारी आघाडीचे सदस्य असल्याचे रशियन एजन्सीने म्हटले आहे. तसेच, रशियन तपास एजन्सीने सांगितले की, हा माणूस अज्ञात मध्य आशियाई देशाचा नागरिक होता.

तो एप्रिल ते जून २०२२ दरम्यान तुर्कीमध्ये राहत होता. एफएसबीने या दहशतवाद्याचा व्हिडिओही जारी केला आहे. त्यात त्याचा चेहरा लपवण्यात आला आहे. दहशतवाद्याने चौकशीत कबूल केले आहे की, त्याने भारतात हल्ल्याचे विशेष प्रशिक्षण घेतले होते.

भारतात पोहोचल्यावर त्याला एक हँडलर भेटणार होता, जो त्याला दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवणार होता. या दहशतवाद्याला प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाचा बदला भारतीय नेत्याकडून घ्यायचा होता. दरम्यान, तुर्कस्तानमध्ये विशिष्ट दहशतवादी हल्ल्यांचे प्रशिक्षण घेतल्याचे आयएस दहशतवाद्याने मान्य केले आहे.

त्याला आयएसच्या दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याला मारण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. या आयएस दहशतवाद्याच्या अटकेनंतर आता भारतातील सुरक्षा यंत्रणांचे कान उभे राहिले आहेत, देशातील नेत्यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची गरज वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारण

Join WhatsApp

Join Now