पुणे शहरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एक आज्ञात व्यक्तीने बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. हाती येत असलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे.
खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. याचबरोबर काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रिझर्व्हेशन कॉऊंटरजवळ जिलेटीनच्या 3 काड्या मिळाल्याने खळबळ उडाली.
घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वस्तू रेल्वे स्टेशनच्या शेजारील मैदानात नेण्यात आली आहे. मात्र ही वस्तू इथे कशी आली, कोणी आणली या संदर्भात चौकशी सुरु आहे. परंतु अद्याप या वस्तूची स्पष्टता होऊ शकलेली नाही.
दरम्यान, पोलिसांना ही बाब कळताच पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉ़र्म क्रमांक 1 आणि 2 रिकामा केला. याचबरोबर परिसरातून प्रवाशांना तातडीने दूर जाण्याच्या सूचना दिल्या. यामुळे काही काळ रेल्वे स्टेशनवर गोंधळ उडाला. सध्या पुणे स्टेशन वर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याचबरोबर पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी करण्यात येत आहे. रेल्वे फलाटावर प्रवाश्यांना फिरकण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोऱ्यांच्या सहाय्याने या ठिकाणी बॅरिगेडिंग करण्यात आलं आहे. तसेच परिसरात तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालं आहे.
तर दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे पुणे नियंत्रण कक्षात काही दिवसांपूर्वी निनावी कॉल आला होता, ज्यात पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान कॉल खोटा असल्याच समोर आलं. मात्र आज बॉम्बसदृश्य वस्तू आढल्याने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हेमा मालिनीला सोडून शबाना आजमीसोबत रोमँटिक अंदाजात दिसले धर्मेंद्र, वाचा काय आहे प्रकरण
मानुषी छिल्लरने पहिल्याच चित्रपटात घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, संजूबाबानेही केली मोठी कमाई
शाहरूखच्या गाण्यावर विदेशी महिलेने केला असा डान्स की पायलटही झाला बेधुंद, पहा व्हिडीओ
भावूक क्षण! प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रूपात पाहून दिघेंच्या बहीनीला अश्रू अनावर