Karan Mehra: करण मेहराने निशा रावलच्या ज्या भावाला तिचा बॉयफ्रेंड सांगितले त्यानेच केली पोलखोल, म्हणाला..

Karan Mehra, Nisha Rawal, Rohit Sethia/ अभिनेत्री निशा रावलचा (Nisha Rawal) मानलेला भाऊ रोहित सेठियाने (Rohit Sethia) करण मेहराच्या (Karan Mehra) दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात त्याने निशा आणि तिच्या विवाहबाह्य संबंधांवर दावा केला होता. रोहितच्या म्हणण्यानुसार, तो निशाला तेव्हापासून ओळखतो जेव्हा करण तिच्या आयुष्यात आला नव्हता. निशासोबतच्या अफेअरच्या बातम्या त्याने फेटाळून लावल्या आहेत. करणने कोणतेही कारण नसताना त्याला या वादात ओढल्याचा दावा त्याने केला आहे.

एका वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात रोहित म्हणाला, आता माझे नाव त्याच्याशी जोडले गेले आहे, तेव्हा साहजिकच मला आनंद होणार नाही. माझी प्रतिमा डागाळली आहे. मी माझ्या वकिलाशी बोललो आहे. मी संपूर्ण कथेच सत्य समोर आणेन. पण त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. मी एक पत्रकार परिषद देखील घेऊ शकतो.

Karan Mehra

रोहित सेठियाने करण मेहरावर एक मोठा आरोप केला की त्याच्या आयुष्यात आणखी एक मुलगी आहे. मात्र, त्याने त्या मुलीचे नाव सांगितलेले नाही, परंतु त्या मुलीच्या नावाचे शॉर्ट फॉर्म एमएम असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार, रोहित म्हणाला, करण मेहराच्या आयुष्यात एक मुलगी आहे. जा आणि त्याला विचारा की एमएम कोण आहे? मी तिचे नाव घेत नाही, पण मी दाव्यासह सांगू शकतो त्याच्या आयुष्यात एमएम नावाची मुलगी आहे.

करण आणि निशाच्या विभक्त होण्याचे एक कारण एमएम होते. काही दिवसांपूर्वी करण मेहराने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात तो म्हणाला होता की, निशा माझ्या घरात दुसऱ्या पुरुषासोबत राहते. आम्ही कोर्टात पुरावे सादर केले आहेत आणि म्हणूनच मी बोलत आहे. निशा रावल, जिचा अजून घटस्फोटही झालेला नाही, ती तिचा मानलेला भाऊ रोहित सेठियासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आहेत.

रोहितने निशाचे कन्यादानही केले होते. मात्र, त्यावेळी माझ्याकडे पुरावे नव्हते. त्यामुळे मी काहीच बोललो नाही. आता माझ्याकडे पुरावे आहेत. करण मेहरा आणि निशा रावल यांचा विवाह 24 नोव्हेंबर 2012 रोजी झाला. दोघेही कविश मेहरा नावाच्या मुलाचे पालक आहेत. मे 2021 मध्ये निशाने करणवर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला आणि एफआयआर दाखल केला.

मात्र, करणने हे आरोप फेटाळून लावले होते. सध्या त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, करण त्याच्या आई-वडिलांसोबत वेगळा राहत असून निशा मुलगा कविशसोबत वेगळ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Karan Mehra: आता ही अभिनेत्री सांगणार करण मेहराबद्दलचे संपुर्ण सत्य, निशा रावलच्या विरोधात देणार साक्ष 
विवेक ऑबेरॉय: वडिलांच्या चित्रपटात काम करण्यास नकार देणारा एकमेव अभिनेता, यशराजशीही घेतला पंगा
स्वप्न पुर्ण करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपची मदत करण्यास महिंद्रांचा साफ नकार; म्हणाले, तो एक
Narendra Modi: जगातील सर्वात सुरक्षित कारने मोदींची लाल किल्ल्यावर ग्रॅंन्ड एन्ट्री, जग पाहतच राहिले