धक्कादायक! व्हॉट्सऍप मेसेज फॉरवर्ड करणं पडलं महागात, महिलेला दिली थेट मृत्युदंडाची शिक्षा

निंदा केल्यामुळे पाकिस्तानातील एका महिलेला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या महिलेने प्रॉफिट मोहम्मद याची खिल्ली उडवणारा मेसेज पाठवला. ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवण्यात आला, त्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहचले.(whatsapp-message-forwarding-woman-sentenced-to-death)

पाकिस्तानात धार्मिक भावना दुखावणे किंवा धर्माविषयी अपशब्द बोलणे, हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. या कारणामुळे भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे पाकिस्तानातील महिलेला या आरोपासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानातील अनिक्वा अतिक नावाच्या महिलेने तिच्या मित्राला व्हॉट्सएपवरुण एक मेसेज पाठवला. त्यात मोहम्मद यांची खिल्ली उडवली होती. यामुळे तिच्या मित्राला राग आला. त्याने तिच्याविषयी थेट पोलिसात तक्रार केली.

त्यानंतर मे 2020 मध्ये पोलिसांनी अनिक्वाला अटक केली. व्हॉट्सएपवरुन एक मेसेजमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्या मित्राने तिच्यावर केला. त्यानंतर वर्षभर खटला चालू राहिला. वर्षभर चालू असणार्‍या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

कोर्टाने अनिक्वाला थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्याचसोबत 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षाही सुनावली. याचा अर्थ 10 वर्ष तिला अगोदर कारावासात राहावे लागणार नंतर तिला मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार आहे.

या कायद्याचा वैयक्तिक शस्त्रुत्वासाठी गैरवापर केल्याचे अनेक लोकांचे आरोप आहेत. निंदेच्या कायदाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विविध समाज संघटनांनीही केला आहे. वैयक्तिक शस्त्रुत्व, बदला घेणे, धडा शिकवणे यांसारख्या कामांसाठी लोकांना जाणीवपूर्वक अशा प्रकारामध्ये अडकवण्यात येते. या कायद्याचा पुरेपूर दुरुपयोग होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या
समंथा आणि नागाचैतन्य पुन्हा एकत्र येणार? अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल
देशात पुन्हा उद्धव ठाकरेंचा बोलबाला! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत टॉप ५ मध्ये