मन उडू उडू मालिकेतून ‘हा’ कलाकार होणार एक्झिट; वेगळेच कारण आले समोर

झी मराठीवरील मन उडू उडू मालिका इंद्रा आणि दिपूमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. परंतु ही जोडी चर्चेत येत असतानाच इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत मालिका सोडणार असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मिडीयावर अजिंक्य राऊत मालिका सोडणार असल्याच्या मुद्द्यावरुन चर्चेत आला आहे. याचे कारण देखील तसेच आहे.

मराठी मालिकांमध्ये कलाकारांना योग्य मानधन मिळत नसल्यामुळे ते दक्षिणात्य चित्रपटात जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिणात्य चित्रपटात मराठी कलाकरांना चांगले मानधन मिळते. त्यामुळे अशाच चित्रपटात काम करण्याचा विचार अजिंक्य करत आहे.

याबाबत त्याने कोणताही उघडपणे खुलासा केलेला नाही. परंतु चाहत्यांनी या विषयीच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगवल्या आहेत. लवकरच अजिंक्य एका दक्षिणात्य चित्रपटात दिसणार असल्याचे ही वर्तविले जात आहे. जर अजिंक्यने मालिका सोडली तर त्याच्या जागी आपल्याला एक नविन चेहरा बघायला मिळू शकतो.

मन उडू उडू मालिकेत सध्या दिपा आणि कार्तिकच्या नात्याला वेगळेवळण लागले आहे. दिपूची बहिण सानिया सतत काही ना काही कटकारस्थान रचताना दिसत आहे. आता तिने आपण आई होणार असल्याची बातमी सर्वांना दिली आहे. तसेच तीने कार्तिक आणि तीच्या नात्याबदल ही खुलासा केला आहे.

त्यामुळे दिपूच्या घरात सर्वांना मोठा धक्का बसला आहे. यातून सावरण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतानाच कार्तिकने सानियाची जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला आहे. यामुळे आता मालिकेत आणखीन काय नविन बघायला मिळेल यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

दरम्यान काही वर्षांपूर्वी कलाकार मोहन जोशी यांनी ही मराठी चित्रपटसृष्टीला रामराम करत दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिणात्य चित्रपटात काम करताना जोशी यांनी बक्कळ पैसा कमावला. यानंतर आता अजिंक्य राऊत दक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
रोहित, विराटपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ खेळाडू; एका आठवड्यात कमावतो तब्बल १६ कोटी
जर भाडेकरूने काही कारणामुळे भाडे भरले नाही तर.., सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरूंना मोठा दिलासा
द काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर लोकांवर होत आहे ‘हा’ परिणाम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
‘पावनखिंड’मध्ये साक्षात शिवरायांच्या रूपात नायक, तर ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये खतरनाक अतिरेकी बिट्टा