Share

खळबळजनक! मामानेच केले भाचीवर लैंगिक अत्याचार, बहिणीच्या विश्वासाचा घेतला गैरफायदा

सध्या महाराष्ट्रात लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकतीच परळीतील धारावती तांडा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर मामानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मामावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेली महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धारावती तांडा परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली होती. ही महिला दररोज वीटभट्टीवर काम करण्यासाठी जात असे. परंतु महिला कामासाठी गेल्यानंतर तीच्या अल्पवयीन मुलीवर मामा लैंगिक अत्याचार करत होता.

या अत्याचाराविरोधात महिलेने अनेकवेळा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने आपल्याच बहिणीला मारहाण केली. महिलेच्या असह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत गलिच्छ दुष्कृत्य केल्यामुळे आरोपीविषयी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी मामा फरार झाला आहे.

पोलीस आरोपीला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. परंतू त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीवर ९९/२०२२ कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन), ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादवी, कलम ३, ४,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

संबंधीत घटनेतील महिला आपल्या पतीला सोडून भावाकडे राहत होती. परंतु याच भावाने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आहे. याकारणाने आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील मामानेच भाचीवर अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

या घटनेतील काही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा देखील सुनावली आहे. मात्र तरी देखील अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
शेन वॉटसनने रोहित शर्माची घेतली क्लास, म्हणाला, ‘या’ खेळाडूवर इतके पैसै खर्च का केले?
क्षुल्लक वाद बेतला आजोबांच्या जीवावर, नातवाने फावड्याने वार करत काढला काटा, वाचून हादराल
कपूर कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे; करिना कपूर पुन्हा करणार लग्न? व्हायरल फोटोनंतर चर्चांना उधाण
शरद पवारांना नास्तिक म्हणणारे राज ठाकरेच निघाले नास्तिक? वाचा व्हायरल पोस्ट आणि त्यामागील सत्य

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now