Share

खळबळजनक! कारचा झाला स्फोट, मृत अवस्थेत आढळलं नग्न कपल, वाचा नेमकं काय घडलं..

गाडीत अचानक स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील अस्वस्थ करणारी बाब म्हणजे दोन्ही मृतदेह हे नग्न अवस्थेत सापडले आहेत. यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. या दोन्ही मृतदेहाचे वय चाळीशीतील असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित घटना औरंगाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांधेली शिवारात घडली आहे. येथे बंद कारमध्ये नग्न अवस्थेत दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गाडीत अचानक स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. ही कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती समोर येत असून मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

घटनेच्या ठिकाणी शेजारीच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने गाडीचा स्फोट होताना पाहिलं तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगतच्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे काम सुरू आहे. याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची तपासणी केली असता त्यात दोन दाम्पत्य नग्न अवस्थेत मृत आढळून आले. कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाला असावा आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक देव गाथ यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आणि स्फोट नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हा स्फोट इतका भयानक होता की, चारचाकी गाडीचे छत पूर्ण जळून खाक झाले आहे. चारचाकीला स्फोट होऊन आग लागल्यानंतर त्या गाडीतील जोडपे जळून ठार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वाहनचोरीमुळे औरंगाबाद पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. आता कारमध्ये स्फोट झाल्यामुळे चिंता वाढली आहे. मानवी वसाहतीपासून काही अंतरावर निर्जळस्थळी या चारचाकीचा स्फोट कशामुळे झाला हा शोध सुरु आहे.

कारचा स्फोट होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. दरम्यान,कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावरील व्हनाळी या गावानजीक चार चाकी गाडीचा स्फोट होऊन एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वाघजाई घाटात या चालत्या कारचा हा स्फोट झाला आणि कार घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली होती.

क्राईम

Join WhatsApp

Join Now