Share

राजकारणात खळबळ! मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा; ‘या’ मागणीसाठी थेट मंत्रालयात धडक

सध्या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयात ठिया आंदोलन केलं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री भेटत नाही तोपर्यंत मंत्रालय सोडणार नसल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मराठा क्रांती मोर्चाने हे आंदोलन केलं आहे. 2014आणि 2019 मधल्या मराठा आरक्षणाच्या नियुक्त्या कधी देणार? असा सवाल करत राज्य सरकारने सारथीचा प्रश्न अजूनही प्रलंबित ठेवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

सारथीची उपकेंद्र, मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी आणि संचालक मंडळ नियुक्ती, कोपर्डी खटला उच्च न्यायालयात सुनावणी, पंजाबराव देशमुख वस्तीगृह सारथीशी संलग्न करणं आणि मराठा आक्षणाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ते अजून सरकारकडून पूर्ण झालेली नाहीत.

सरकारने यासंदर्भातील कारवाई न केल्यानं आज आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. 15 मार्चला आम्ही आलो होतो, त्यानंतर आम्ही तीन वेळा आलो, मात्र आमची फसवणूक केली जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं उपोषण सोडण्यास आलेल्या मंत्र्यांनी आमच्या प्रलंबित प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेत, अशी मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे. संभाजी महाराजांचे उपोषण सोडताना सरकारच्या वतीने प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला गेला होता. मात्र, 15 मार्चनंतर देखील प्रश्न सुटले नाहीत, त्यामुळे आंदोलन करत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सांगितले.

राज्य सरकारकडून मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळच्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा क्रांती मोर्चाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्य सरकार याबाबत उद्या कोणती भूमिका घेईल हे पाहणं आवश्यक राहील.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now